शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा हादरला; दोन भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 07:45 IST

रुग्णवाहिका ट्रकला पाठीमागून धडकली तर ट्रॅव्हल्स नियंत्रण सुटल्याने उलटली

- नितीन कांबळेकडा- धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला व्यंको कंपनीकडे वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. तर आज सकाळी सहा वाजता दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक ( क्र. MH 21 X 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या  रुगणवाहिकेने (क्र. MH 16 Q 9507 ) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर  डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर  हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सपोनि. ढाकणे, पोउपनि. सातव, सफौ./रोकडे, पोशि/केदार, शिरसाट, चालक पोशि/कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना अहमदनगर येथे दवाखान्यात रवाना केले.

तर दुसऱ्या अपघातात मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या  सागर ट्रॅव्हल्स ताबा सुटल्याने सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याची घटना आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नजीक घडली आहे.यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण जखमी झाले आहेत. 

     मुंबई वरून बीडकडे निघालेली सागर ट्रॅव्हल ही बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा नजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वर आष्टी,जामखेड येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात असून आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात