आॅफिसमध्ये व्यस्त काम करताना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:34 IST
एकाच दिवसात वेगवेगळी कामे करणे हे अशक्य नाही. परंतु, कठीणही असू शकते.
आॅफिसमध्ये व्यस्त काम करताना...
आॅफिसममध्ये कोणताही बॉस आपल्यावर कामाचा किती भार आहे. हे पाहत नसतो. त्याला तर केवळ आपल्याकडून रिझल्ट हवा असतो. आपल्यावरही कामाचा अधिकचा भार असेल तर शांत राहू नका. एक मनुष्य किती काम करु शकतो. हे बॉसला सांगावे तसेच मदत माघणेही सोडू नये. दिवसभराच्या व्यस्त कामाच्या या काही टिप्स...1 सर्वात पहिले म्हणजे सर्व काम एकदा बघून घ्यावे. सकारात्मक विचार करुन, ते सुरु करावे. मी करु शकतो, हे स्वत: लाच सांगावे. त्यामुळे कोणतेही काम सोपे होते.2 काम सुरु करण्याच्या पूर्वी लिस्ट तयार करणे हे खूप महत्वाचे आहे. जे काम पूर्ण झाले. त्याच्यावर टिक करुन ठेवावी. जसे काम होईल, तसेच टिक करावी. त्यामुळे काम होत आहे, असे आपल्याला वाटत असल्याने उत्साह वाढतो. लिस्ट3 शांततेने काम करणे हे खूप महत्वाचे आहे. राग आल्यामुळे काम कमी होत नाही तर उलट ते वाढते.4 स्वत: ला कधीही सुपरमॅन समजू नका. कारण की, कोणतेही काम हे आपण वेळेवरच करु शकतो. संपूर्ण लक्ष एकच काम पूर्ण करण्यासाठी लावावे. दहा कामे सोबत करण्यामुळे गडबड होण्याचा धोका मोठा असतो.