शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

नववधूंसाठी हा श्रृंगार तर एक आगळा-वेगळा दागिनाच असतो. म्हणून खरेदी करताना तर काळजी घ्यायलाच हवी...!

भारतीय परंपरेनुसार स्त्रियांच्या सोळा श्रृंगारांपैकी एक प्रकार म्हणजे बांगड्या होय. नववधूंसाठी हा श्रृंगार तर एक आगळा-वेगळा दागिनाच असतो. यामुळे नववधूचा संपूर्ण लूकच आकर्षक वाटतो. महाराष्ट्रात नववधूला हिरव्या रंगाच्या तर पंजाबमध्ये लाल-पाढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात. लग्नप्रसंगी घातलेल्या बांगड्यांना चुडा म्हणतात. * काय आहे चुड्याची परंपरागडद हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या लग्नप्रसंगी मामा नववधूला घालतो, त्याला लग्नचुडा म्हणतात. नववधू जरी खूप ज्वेलरी घालत असली तरी या चुड्यांना खूपच महत्त्वाचे स्थान आहे. इतर महिलाही हिरव्या बांगड्या घालतात, परंतु तो चुडा नसून सामान्य बांगडीच असते. * वर्षभर घातला जातो महाराष्ट्रात आणि पंजाबमध्येही नववधूला वर्षभर हा चुडा घालावा लागतो. परंतु, आजकाल नववधू ४० दिवसच हा चुडा घालतात. हे विवाहित असल्याचे प्रतिक आहे. तसेच प्रजनन आणि समृद्धीचेही संकेत देते. याचबरोबर पतीच्या चांगल्यासाठीही घातले जातात. लग्नप्रसंगी वधूचा आवडता साज म्हणजे लग्नाचा जोडा. कारण लग्नात सर्वांच्या नजरा ह्या वधूकडेच असल्याने आपण आकर्षक दिसावे असे तिला वाटते. मात्र जोड्याबरोबरच बांगड्याही आकर्षक असाव्यात हेदेखील तिला वाटत असते. म्हणून जोड्यावर बांगड्या खुलून दिसण्यासाठी तिचा मनासारख्या बांगड्या खरेदी करण्याकडे कल असतो.* प्लेन बांगड्याआज मार्केटमध्ये विविध प्रकारच्या डिझायनर बांगड्या जरी आल्या असल्या तरी लाल व मरुन रंगाच्या प्लेन बांगड्या ह्या कोणत्याही फॅशनमध्ये सदाबहार दिसतात. विशेष म्हणजे लग्नाच्या जोड्याला ह्या बांगड्या मॅचही होतात. * ड्रेसला मॅचिंगबऱ्याचजणांना प्लेन बांगड्या आवडत नाहीत. त्यांना वेगळा स्टायलिश लूक हवा असतो. यासाठी आपण आपल्याकडे असलेल्या रंगबिरंगी ड्रेसनुसार वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घेऊ शकता. या तुम्हाला एक खास लूक देतील.* बिकानेरच्या बांगड्यालाल आणि मरून रंगाच्या बिकानेरच्या बांगड्या उत्तर भारतात लग्नात वधूने वापरणे शुभ मानले जाते. या बांगड्या आपणही वापरुन लग्नप्रसंगी वेगळा लूक मिळवू शकता. या बांगड्यांचे वैशिट्य म्हणजे ह्या चमकदार असतात.