झोपेतून लवकर उठायचे आहे ...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:41 IST
रात्री झोपतांना अनेकजण विचार करतात की, सकाळी सहा वाजता उठू.
झोपेतून लवकर उठायचे आहे ...?
परंतु, कितीही विचार केला तरीही सात वाजतातच. दररोज हे अनेकांसोबत घडतेच, काहीकेल्या सकाळी अंथरुन सोडावेच वाटत नाही. वेळेवर उठण्यासाठी या काही खास टिप्सउठण्याच्या वेळेचाच अलार्म लावा : काही लोक त्यांना सकाळी ७ वाजता उठावयाचे असेल तर ते ६ किंवा ६:३० अलार्म लावतात. त्यांना वाटते अलार्म वाजल्यानंतर बंद करुन आपल्या ठरलेल्या वेळेला उठू. परंतु, ही चुकीची सवय आहे. त्याकरिता जेव्हा आपल्याला उठायचे त्या वेळचाच अलार्म लावावा.अलार्म अंतरावर ठेवा : उठण्याच्या वेळीला जरी आपण अलार्म लावलेला असला तरीही, अनेकदा तो जवळच असल्याने,आपण तो बंद करतो. व पुन्हा झोपी जातो, यामुळे आपले वेळेवर उठणे होत नाही. याकरिता अंतरावर असलेला अलार्म बंद करण्यासाठी आपल्याला उठून चालत जावे लागते. त्यामुळे आपण चालल्यानंतर पुन्हा झोपत नाही. खिडकीचा पडदा हटवावा : रात्रीला झोपण्यापूर्वी खिडकीचा पडदा काढून टाकावा. त्यामुळे सकाळी सूर्यांचे किरणे आपल्यावर आल्यानंतर आपल्या लगेच जाग येईल. दररोज वेळेवर झोपा : अनेकजण उद्या सुटी आहे, म्हणून रात्री उशीरा झोपतात. त्यामुळेही सकाळी उठायला उशीर होतो. त्याकरिता दररोज वेळवर झोपणे हीच चांगली सवय आहे. व्यायाम : ज्यांना दररोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय असते. असे लोक दररोज सकाळी लवकर उठतात. त्याकरिता व्यायामाची सवय करा. जादा पाणी प्या : सकाळी लवकर उठण्यासाठी जादा पाणी पिणे आवश्यक आहे. उठल्यानंतरही एका तासाच्या आत पाणी प्या. त्याचा सकाळी लवकर उठण्यासाठी फायदा होतो.