(Image Credit : bebeautiful.in)
डोक्यावर हेल्दी, चमकदार, मजबूत केस असतील तर पर्सनॅलिटीमध्ये भर पडते. कारण चमकदार आणि मजबूत केसांनी तुम्हाला आकर्षक लूक मिळतो. प्रत्येक महिला आणि पुरूषांची इच्छा असते की, त्यांचे केस काळे, दाट आणि चमकदार असावेत. पण वाढत्या प्रदूषणामुळे, धुळ-माती यामुळे, केसांची काळजी न घेणं आणि आहाराकडे दुर्लक्ष करणे यामुळे कमी वयातच केसगळती होऊ लागते. तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
१) केस मजबूत नसतील तर ते गळतीलच. केस मुळातून मजबूत ठेवण्यायासाठी आधी डॅंड्रफची समस्या दूर करा. पण याचा अर्थ असा नाही की, डॅंड्रफची समस्या दूर करण्यासाठी शॅम्पू जास्त वापरावं. रोज केसांना शॅम्पू करणं टाळलं पाहिजे. तसेच शॅम्पू केल्यावर डोक्याची त्वचा चांगल्या प्रकारे धुवावी. जेणेकरून शॅम्पू चिकटून राहू नये. याने डॅंड्रफची समस्या होते.
२) तुम्हाला जर वाटत असेल की, कमी वयात तुमचे केस गळू नयेत, पांढरे होऊ नये तर नैसर्गिक उपायांनी केस काळे करण्याचा प्रयत्न करा. याने केसांना मजबूती मिळेल. बाजारात मिळणारे केमकलयुक्त हेअर कलरिंग प्रॉडक्ट्स अधिक लावल्याने केस तुटतात आणि पांढरे पण होतात. केस मुळातून कमजोर होतात.
३) ओले केस बांधून ठेवणं टाळावे. असं करूनही केस तुटू लागतात. रात्री केसांना तेल लावून झोपल्याने केस मुळातून कमजोर होतात. त्यामुळे सकाळी केस धुण्याच्या एक ते दोन तासआधी केसांना तेल लावावे.
४) नियमितपणे व्यायाम केल्यानेही केसगळती कमी होते. तुम्ही शारीरिक रूपाने सक्रिय राहिला नाही तर केसगळती होणारच. कारण शरीराची हालचाल झाली नाही किंवा तुम्ही सक्रिय राहिला नाही तर डोक्यात आणि डोक्याच्या त्वचेत रक्तप्रवाह कमी होईल. त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी पोषण मिळणार नाही. याने केसगळती होणार.
५) भरपूर पाणी प्यायल्यानेही केसगळती कमी केली जाऊ शकते. दर दोन ते तीन तासांच्या अंतराने एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने डोक्याच्या त्वचेत रक्तप्रवाह कायम राहतो. याने केसांची मूळं मजबूत होतात.
६) केस मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं असतं. तसेच व्हिटॅमिन डी ने केसांचा विकासही चांगला होतो. शरीरात आयर्न कमतरता होऊ देऊ नका नाही तर केसगळतीची समस्या वाढेल. थोडा वेळ उन्हात बसा. तणाव दूर करा. तणाव दूर करण्यासाठी योगा आणि मेडिटेशनची मदत घ्या. फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.