केवळ तीन मिनिटांत दात होतील चमकदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:24 IST
दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता.
केवळ तीन मिनिटांत दात होतील चमकदार
स्वच्छ आणि सुंदर दात हे सौंदयार्चे लक्षण आहे. मात्र सकाळी उठल्याबरोबर दात घासण्यापलीकडे दातांची विशेष काळजी घेतली जात नाही. धुम्रपान, वेळी अवेळी खाण्याच्या विविध सवयींचा परिणाम दातांवर होत असतो.अनेकदा खाल्ल्यानंतर पदार्थ दातात अडकतात ते वेळीच साफ केले नाहीत तर दात खराब होऊ शकतात. यामुळे दातांवर पिवळेपणा चढू शकतो. त्यामुळे दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता.यासाठी बेकिंग सोड्याचा वापर फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा आणि लिंबाचे मिश्रण करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन नेहमीप्रमाणे दात घासा. तीन मिनिटांत तुमचे दात मोत्यासारखे चमकदार होतील.