आता घ्या डॉक्टरांचा आॅनलाईन सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 00:50 IST
‘सीडॉक’ (रीीऊङ्मू) नावाच्या या अॅपद्वारे तुम्ही देशातील आघाडीच्या संस्थांतील डॉक्टरांशी बोलू शकता.
आता घ्या डॉक्टरांचा आॅनलाईन सल्ला
आपल्या आरोग्याची काळजी घेणारे एक असे स्पेशल अॅप तयार करण्यात आले आहे, ज्याद्वारे आपण थेट डॉक्टरांचा आॅनलाईन व्हिडियोद्वारे सल्ला घेऊ शकतो.‘सीडॉक’ (रीीऊङ्मू) नावाच्या या अॅपद्वारे तुम्ही देशातील आघाडीच्या संस्थांतील डॉक्टरांशी बोलू शकता.सामान्य आजार, लैैंगिक आरोग्य, त्वचारोगतज्ज्ञ, मधूमेह आणि इतर अनेक आजारांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता.मात्र, यासाठी तुम्हाला थोडीशी किंमत मोजावी लागणार आहे. आठवड्याचे सातही दिवस तुम्ही ठराविक फी भरून डॉक्टरांचे व्हिडियोद्वारे मार्गदर्शन घेऊ शकता.‘सीडॉक’ अॅपचे सहसंस्थापक अनुज अगरवाल यांनी सांगितले की, देशाती सर्वोत्तम डॉक्टर्सची आम्ही निवड केली आहे. एम्स, फोर्टिस, मेदंता, मॅक्स, एएफएमसी, एमएएमसी आणि मणिपाल अशा टॉप मेडिकल इन्स्टिट्यूशनमधील डॉक्टर्सचा यामध्ये सामावेश आहे. आतापर्यंत तीन लाख लोक हे अॅप वापरत असून यूजर्सची संख्य झपाट्याने वाढत आहे. दिवसातून ५०० व्हिडियो कन्सल्टेशन केले जातात. अॅन्ड्राईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.