शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 12:11 IST

खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात.

सध्यातरी उन्हाळा पूर्णपणे सुरू झाला असे म्हणता येणार नाही. पण उन्हाचा पारा दिवसा वाढलेला असतो. अशात उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा असलेल्यांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते.  घामामुळे ही समस्या आणखीनच वाढते. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणे सोपे जाईल. 

कोमट पाण्याने चेहरा धुवा

तेलकट त्वचा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी अधिक चांगलं मानलं जातं. कारण या पाण्याने धूळ आणि प्रदूषण चांगल्याप्रकारे त्वचेवरून स्वच्छ केलं जाऊ शकतं.

पुन्हा पुन्हा चेहरा धुवू नका

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा धुवावा. दोनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका. असे केल्याने त्वचा रफ होते आणि ती ठिक करण्यासाठी तुमचे ग्लॅंड्स आणखी जास्त आइल रिलीज करतात. 

कमी मेकअप

उन्हाळ्यात जितकं हलकं मेकअप करू शकाल तितकं चागलं. हेवी फाउंडेशन लावणे टाळा आणि मॉइश्चरायजरचा सुद्धा वापर कमी करावा. 

बनाना हनी फेसपॅक

जर तुम्ही आयली स्कीनसाठी वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून थकले असाल तर काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. केळी आणि मधाचा फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी एक केळी आणि एक चमचा मध घ्या. याची चांगली मुलायम पेस्ट तयार करा. त्यात थोडा लिंबाचा रस मिश्रित करा. त्यानंतर हा फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. 

अ‍ॅपल हनी फेसपॅक

हा फेसपॅक ऑयली स्कीनसाठी परफेक्ट फेस मास्क आहे. मधामुळे स्कीनला सॉफ्ट टेक्स्चर मिळण्यास मदत होते. तर सफरचंदामुळे स्कीनला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीSummer Specialसमर स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्स