उन्हाळ्यात कलिंगडाने खुलवा सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 18:11 IST
कलिंगडाचा थंडगार गर चेहºयाला लावावा
उन्हाळ्यात कलिंगडाने खुलवा सौंदर्य
उन्हाळ्यात आपण घराबाहेर पडल्यानंतर आणि घरी परत येतांना आपली त्वचा लालसर झालेली असते. त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. अशावेळी, कलिंगडाचा थंडगार गर चेहºयाला लावावा आणि तो सुकल्यावर स्वच्छ करावा.उत्तम परिणाम हवे असतील तर कलिंगडाच्या गरामध्ये काकडीचा गर मिसळू शकता आणि हे मिश्रण चेहºयाला लावावे. चेहरा 15 मिनिटानंतर स्वच्छ धुवावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कलिंगडाच्या गरामध्ये थोडेसे दही टाकावे आणि त्याचे एकजीव मिश्रण तयार करुन व्यवस्थितपणे चेहºयाला लावावे. त्वचा जर कोरडी असेल तर दह्याऐवजी केळ कुस्करून ते कलिंगडाच्या गरामध्ये मिसळावे.हे मिश्रण चेहºयावरील मृत पेशी काढून टाकते. कलिंगड उत्तम टोनर म्हणूनही आपण वापरू शकतो. ज्या व्यक्तिंची त्वचा कोरडी आहे त्यांनी कलिंगडच्या रसामध्ये मध मिसळावे आणि हे मिश्रण चेहºयाला लावावे. पण ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना मात्र ही क्रिया करण्याची आवश्यकता नाही.