मधुमेहींसाठी ‘खास’ चॉकलेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 03:55 IST
लवकरच मधुमेहींनादेखील स्वादिष्ट चॉकलेटचा आस्वाद घेता येणार आहे.
मधुमेहींसाठी ‘खास’ चॉकलेट
लवकरच मधुमेहींनादेखील स्वादिष्ट चॉकलेटचा आस्वाद घेता येणार आहे. चविष्ट आणि पोषक तत्वांनी युक्त असे गुळापासून तयार करण्यात आलेले चॉकलेट येत्या काही दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे. शोधकर्त्यांचा एक समूह या दिशेने काम करत आहे. सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेल्या चॉकलेटमध्ये पौष्टिक तत्वांची कमतरता असते. यामध्ये प्रोसेस्ड साखरेचा वापर केलेला असतो.हे चॉकलेट खाल्याने दात किडणे, दातांमध्ये फटी निर्माण होणे आणि मधुमेहासारख्या व्याधी अथवा आजार होण्याची भीती असते. नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या चॉकलेटमध्ये प्रोसेस्ड साखरेच्या जागी विविध प्रकारच्या गुळाचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.चॉकलेटचा स्वाद कायम राखण्यासाठी पातळ गुळात कॉफी अथवा कोको पावडचा वापर करण्यात असल्याचे सांगितले.