मुलांना कॅन्सरपासून वाचवा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:37 IST
कॅन्सर आजही दूर्धर आजार आहे. लहानपणी कॅन्सरची लागण तर फारच वाईट.
मुलांना कॅन्सरपासून वाचवा..
कॅन्सर आजही दूर्धर आजार आहे. लहानपणी कॅन्सरची लागण तर फारच वाईट. लहान मुलांना कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण त्यांच्या पालकांचा व्यावसाय/नोकरी, मेडिकल हिस्ट्री, तंबाखू-दारूचे व्यसन, खाणपान हे आहेत. या गंभीर आजारापासून आपल्या मुलाला लांब ठेवायचे असेल तर आपल्या जीवनपद्धतीमध्ये आरोग्यदायी बदल आवश्यक आहेत. कसे ते वाचा जरा.. १. आहार : या आजारापासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट, मिनरल्स, व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या आणि फळे खाण्यास प्रोत्साहित करावे.२. व्यायाम : मुलांना व्यायामाची सवय असली पाहिजे. पुरेशी शारीरिक हालचाल आरोग्यासाठी फार गरजेची असते.३. बालवयातील लठ्ठपणा : लहान वयातच येणारा लठ्ठपणा फार गंभीर समस्या आहे. फास्ट फूड, जंक फूड, गोडधोड पदार्थांचे प्रमाण कमी करा.४. युव्ही किरणांपासून बचाव : मुलांच्या अरोग्यासाठी अल्ट्रा व्हायलेट किरण खूप अपायकारक असतात. त्यामुळे यूव्ही किरणांपासून त्यांचा बचाव करा.५. रोगप्रतिकारशक्ती वाढवा : योगर्ट, लसून, रंगीत फळे, भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक असतात. रोजच्या आहारात त्यांचा सामावेश असावा.६. कॅन्सर लस : वयाच्या ११व्या किंवा १२व्या वर्षी कॅन्सर विरोधी एचपीव्ही लस टोचली पाहिजे. स्वादुपिंड, योनी, मानेच्या कॅन्सरपासून यामुळे बचाव होतो.