शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

त्वचेवरील सक्रिय किटाणूंमुळे पाठीवर दाण्यांसारखे डाग पडतात; 'या' घरगुती उपायांनी ठेवा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 13:26 IST

काही लोकांच्या पाठीवर दाणे येतात. हळूहळू त्यांचा आकार वाढत जतो. फिकट लाल रंगाचे असतात. अनेकदा असह्य्य वेदना होतात.

पाठीवर  दाणे येण्याची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला उद्भवू शकते. महिला आणि पुरूषांमध्ये ही समस्या उद्भवणं सामान्य स्थिती आहे.  तरूण वयातील मुलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे, अनेकांना अनुवांशिक कारणामुळे त्वचेची समस्या उद्भवते.  प्रत्येकाच्या पाठीवर आणि खांद्यावर येत असलेल्या डागांचे स्वरुप वेगवेगळं असतं. त्यात काही लोकांना एक्नेची समस्या असते. एक्ने पिकल्यानंतर फुटतात. पुळ्याप्रमाणे दाणे येतात. त्यामुळे अनेकांना वेदना होत नाहीत. 

काही लोकांच्या पाठीवर दाणे येतात. हळूहळू त्यांचा आकार वाढत जतो. फिकट लाल रंगाचे असतात. अनेकदा असह्य्य वेदना होतात. हे दाणे पिकल्यानंतर न फुटता आपला डाग तसाच ठेवतात. शरीरातील हार्मोनल  असंतुलनामुळे  हे बदल घडून येतात. अनेकदा पोटासंबंधी समस्याही याचं कारण असू शकतं. ज्या लोकांना पोट साफ होण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागतो. पचनतंत्र व्यवस्थित नसते. त्यांना ही समस्या उद्भवते.

अनेक महिलांना मासिक पाळी येण्याच्याआधी पाठीवर असे दाणे येतात. वेळीच घरगुती उपचार केल्यानं तुम्ही अशा समस्यांपासून लांब राहू शकता. या डागांमुळे डागांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशी समस्या उद्भवल्यास लहान मुलांचे मनोबल वाढवायला हवं. दीर्घकाळ औषधांचं सेवन करणं या डागांचे कारण असू शकते. वेळीच लक्ष दिलं नाही तर पाठीवरून कमरेपर्यंत हे दाणे वाढत  जातात.

पाठीवरच्या या डागापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्याच्या आणि थंडीच्या वातावरणात मोहोरीच्या तेलानं मालिश करू शकतात. त्यासाठी सगळ्यात आधी राईचं किंवा नारळाचं तेलं घ्या. त्यानंतर यात अर्धा चमचा ओवा आणि ४ ते ५  बारिक कापलेले लसूण घाला. कमी आचेवर ५ मिनिटं ते तेल गरम करून घ्या.तुम्हाला लसूण वापारायचा नसेल तर मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता. नंतर थंड करून गाळून घ्या.

एका बाटलीत भरून  रोज दिवसातून दोनवेळा या तेलानं मालिश करा. सकाळी अंघोळ करण्याआधी किंवा  रात्री झोपताना या तेलानं मालिश केल्यास दाणे निघण्याची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येकाची  त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे हा उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे पण वाचा-

खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या

देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealthआरोग्य