डोळ्यांचेही सौंदर्य खुलवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 19:19 IST
चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते
डोळ्यांचेही सौंदर्य खुलवा !
चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते. मग कसे वाढवाचे डोळ्यांचे सौंदर्य हे जाणून घेण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. * आय प्रायमर आय शॅडोचा रंग गडद होण्यासाठी डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी आय प्रायमर लावणे आवश्यक आहे. यामुळे पापण्या मऊ होतात व डोळ्यावरील मेकअप दीर्घकाळ टिकतो. * हायलाइटरडोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी भुवयांवरील हाडावर हायलाइटर लावा. यामुळे डोळ्यांना सुंदर आकारही मिळतो व सुंदर दिसतात. * मस्कारा डोळ्यांना बाहेरच्या दिशेने व वरच्या बाजूने मस्कारा लावल्यास डोळे टपोरे दिसण्यास मदत होते. यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते.* आय लाइनरडोळ्यांना हटके लूक देण्यासाठी आयलाइनरची भूमिका महत्त्वाची ठरते, यासाठी वेगवेगळ्या शेपच्या आयलायनरची निवड करु शकता. * कोल पेन्सिलबहुतेक महिला कोल पेन्सिलचा वापर करतात, मात्र आपले डोळे बदामासारखे टपोरे असतील तरच कोल पेन्सिल लावा, अन्यथा लावू नका, नाहीतर आपले डोळे छोटे दिसतील आणि आपल्या सौंदर्यात बाधा ठरेल.