ऐन उन्हाळ्यातही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ऑईल वॅक्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 03:38 PM2020-03-06T15:38:33+5:302020-03-06T15:49:14+5:30

हातापायावरचे केस जास्त वाढले असतील तर ऑफिसमध्ये किंवा चारचौघात चांगलं दिसत नाही. म्हणूनच नेहमी प्रेजेंंनटेबल राहणं गरजेचं आहे.

Oil wax for soft and shiny skin in the summer myb | ऐन उन्हाळ्यातही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ऑईल वॅक्स....

ऐन उन्हाळ्यातही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ऑईल वॅक्स....

Next

उन्हाळ्याचं वातावरण सुरू झाल्यानंतर मुली शॉट्स, स्कर्ट किंवा स्लिवजलेस घालायला सुरूवात करतात.  त्यासाठी वॅक्सिंग व्यवस्थित केलेलं असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण शॉर्ट ड्रेस किंवा स्कट घालत असतो. तेव्हा शरीराचा काही भाग उघडा असतो. त्यामुळे  तो व्यवस्थित दिसायला हवा. त्यासाठी वॅक्सिंग करणं गरजेचं असतं. नाहीतर ऑफिसमध्ये किंवा  चारचौघात चांगलं दिसत नाही. म्हणूनच नेहमी प्रेजेंंनटेबल राहणं उत्तम ठरतं.

वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवरील मृतपेशी नष्ट होत असतात. कारण वॅक्सिंग केल्यानंतर  त्वचेचा मुळ रंग दिसायला सुरूवात होत असते. त्यासाठी गरजेचं असतं. ते म्हणजे  ऑईल वॅक्स , आज आम्ही तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने ऑईल वॅक्स करता येतं याबद्दल सांगणार आहोत. 

नॉर्मल वॅक्समध्ये शुगर असते. त्यामुळे जास्त गरम पाण्याचा वापर केल्यामुळे  त्वचा जळण्याची शक्यता असते. तुलनेने ऑईल वॅक्स जास्त गरम वापरले तरी त्वचेवर फारसा फरक पडत नाही. वॉटर बेस्ड् नॉर्मल वॅक्सिंगच्या वेळी  त्वचेवर पावडर लावून गरम वॅक्स लावलं जातं.  याऊलट ऑईल वॅक्समध्ये सगळ्यात आधी त्वचेवर लेवेंडर, ऑलिव्ह ऑईल वापरलं जातं. 

महिला उन्हाळ्यात शॉर्टस आणि स्कर्टस असे ड्रेस जास्त घालतात. त्यामुळे त्वचा आणि शरीर आकर्षक  दिसत असतं.  याच कारणामुळे अनेक मुली त्वचा चमकदार बनवण्यासाठी ऑईल वॅक्सचा वापर करतात. या टेक्निकचा वापर करून  त्वचेवरील केस तुम्ही काढू शकता. 

(Image credit- healthline)

ऑईल वॅक्सिंगमुळे त्वचेला शाईनिंग येण्याचं सगळयात महत्वाचं कारण असं की ते केसांना मुळांपासून काढून टाकते. या दरम्यान  वेदना  सुद्धा कमी होतात.  तसंच मृतपेशी सुद्धा निघून जातात. केस कितीही  दाट आणि रफ असले तरी सहजतेने निघण्यास मदत होते रिका वॅक्स, हनी वॅक्स अशा वेगवेगळ्या वॅक्सचा वापर केला  जातो. पण या सगळयांपेक्षा ऑईल वॅक्स उत्तम आहे. ( हे पण वाचा-टुथपेस्टसोबत 'या' गोष्टी त्वचेवर लावाल, तर ब्लीच, फेशियल करणंच विसरून जाल...)

Image result for oil wax

ऑईल वॅक्ससाठी किती पैसे खर्च करावे लागणार असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, ऑईल वॅक्सची  किंमत खूप कमी असते. नॉर्मल वॅक्सप्रमाणेच या वॅक्सची किंमत असते. तुम्ही  होळी खेळून झाल्यानंतर  त्वचेचा कोरडेपणा आणि  टॅनिंग घालवण्यासाठी हे वॅक्स करू शकता. ( हे पण वाचा-प्रियांका चोप्रा सुद्धा करते 'हे' इलेक्ट्रिक फेशियल, जाणून घ्या खासियत)

Web Title: Oil wax for soft and shiny skin in the summer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.