शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

आता घरीच करा ‘हेअर स्पा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:37 IST

केसांना योग्य पोषण मिळून ते चमकदार होण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जातात.....

केसांना योग्य पोषण मिळून ते चमकदार होण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जातात. मात्र पार्लरमध्ये रोजच हेअर स्पा करणे खर्चिक आहे. यामुळे घरच्या घरी हेअर स्पा कसा करावा याबाबत जाणून घेऊया...* केसांना नैसर्गिक चमक येण्यासाठी केसांचे आरोग्य उत्तम असावे. यासाठी डोक्याला आॅलिव्ह तेल लावून  हलक्या हाताने १५ मिनिटे मालिश करा. यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवा आणि तो पुन्हा चांगला पिळून डोक्याला गुंडाळा. यामुळे डोक्याला वाफ मिळेल. यानंतर केस ओले करून सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास ते चमकदार होतील.* केसाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने उपलब्ध आहेत. त्यासाठी खोबरेल तेलामध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा आणि हे मिश्रण डोक्याला लावा. थोड्या वेळानंतर एक पिकलेले केळ कुस्करुन केसाच्या मुळांपासून-टोकांपर्यंत लावा. यावर गरम टॉवेलने पॅक करुन १५ मिनिटांनी थंड पाण्याने केस धुऊन नंतर हर्बल शॅम्पूने धुवा. केळामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम, नैसर्गिक तेल, जीवनसत्व यामुळे केस मुलायम होतात. * दुधातील पोषक घटक केसाचे योग्य प्रकारे पोषण करतात. कोमट दुधामध्ये थोडेसे आॅलिव्ह तेलाचे थेंब टाकून हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर थोडावेळ हळूवार केसाचे मालिश करा. मालिश केल्यानंतर वाफ द्या. असे पंधरा दिवसातून एकदा केल्यास तुम्हाला मुलायम आणि चमकदार केस मिळतील.