शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

रात्रीची झोप आणि सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 18:19 IST

रात्रीची शांत आणि सुखाची झोप तुमच्या आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि मनासाठी उत्तम असते. तुम्ही कसे झोपता यावरुन तुमचा चेहरा, त्वचा आणि एकंदरच तुमचा लूक दिसून येतो. चांगली झोप स्वत:लाच टवटवीत बनविते आणि दिवसभरासाठी तुम्हाला अधिक ताकद, ऊर्जा देते

रात्रीची शांत आणि सुखाची झोप तुमच्या आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि मनासाठी उत्तम असते. तुम्ही कसे झोपता यावरुन तुमचा चेहरा, त्वचा आणि एकंदरच तुमचा लूक दिसून येतो. चांगली झोप स्वत:लाच टवटवीत बनविते आणि दिवसभरासाठी तुम्हाला अधिक ताकद, ऊर्जा देते. दिवसभर तुमच्या त्वचेला चकाकी देण्याचेही काम करते. तुमच्या दिवसभरातील काम चांगल्या पद्धतीने व्हावे असे वाटत असेल तर तुमचे शरीर आणि मन चांगले असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरामदायी आणि शांत राहण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्युटीशियन आणि हेअर कन्सल्टंट सुनीता मोटवानी-मखिजा याबाबत सांगत आहेत...चांगल्या झोपेसाठी काही टिप्स...तुम्ही जण तणावात असाल तर लगेचच झोपायला जाऊ नका. तुम्ही झोपेसाठी प्लॅन करा. यासाठी पुस्तके वाचा किंवा छानपैकी गाणं ऐका ज्यायोगे तुम्ही स्वत:ला रिलॅक्स करु शकाल.खूप उशिराने रात्री जेऊ अथवा पिऊ नका. जोपर्यंत तुमच्यातील पचनाची क्रिया सुरू असते, तोपर्यंत शरीर विश्रांती घेऊ शकत नाही. रात्री कोमट पाण्याने किंवा कमी गरम पाण्याने अंघोळ करा. चांगल्या तेलाने आपले अंग भिजवून घ्या. यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल.तुम्हाला ज्यावेळी झोप येत नसेल त्यावेळी अगदी सोपी उत्तरे आहेत. तुम्हाला झोपण्याची गरज नसते. स्वत:ला झोपेच्या अधीन करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळी तुमचे शरीर थकलेले असेल त्यावेळी तुमचे डोळे आपोआप मिटले जातील. दरम्यान, तुम्ही वाचा किंवा काही संगीत ऐका.आराम हा गरजेचा आहे. तुमचा बेड हा कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही सहज झोपू शकत नाही.झोपत असताना तुम्ही तुमचे सगळे प्रश्न विसरून जा. झोपेमुळे तुम्हाला आराम मिळेल आणि सकाळी तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल. दिवसभराच्या आव्हानांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता.  प्रत्येक दिवशी आपल्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थांवर झोप मात करते. वयोमानानुसार होणाऱ्या हानीइतकाच झोपेमुळे शारीरिक परिणाम होतो. आपल्या मेंदूतील प्रत्येक पेशींदरम्यान एकमेकांशी परमाणू जोडले गेलेले असतात. ते झोपेच्या महत्त्वासंदर्भात जोडले गेलेले असतात.  तुमचे सौंदर्य आणि अधिक उत्तम शरीर तसेच तंदुरुस्तीबाबत महत्त्वाचे आहे.प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारची रात्र पार्टी नाईट म्हणून ओळखली जाते. तथापि रविवारी रात्री तुम्ही छानपैकी झोपून जा. पुढच्या आठवडाभर अधिक ताजेतवाने राहण्यासाठी ते उपयोगी पडेल.