खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठी मेंटल गेम्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 18:10 IST
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आपण वजन कमी करू शकतो.
खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठी मेंटल गेम्स
मेंटल गेम व्हिडीओ गेम्ससारखाच वाटत आहे. पण, यामध्ये बºयाच सायकॉलॉजिकल स्किल्स आहेत. यामुळे ब्रेन व्यस्त राहतो आणि विचारामध्ये सकारात्मक बदल होतात. मेंटल गेमचा मुख्य उद्देश म्हणजे, याविषयीचा एक व्हिडीओ बघून त्याआधारे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आपण वजन कमी करू शकतो.लंडनमधील एक्सायटर आणि कॅर्डिफ विद्यापीठाने जॉइंटली केलेल्या या व्हिडीओमुळे मार्इंड शार्प होण्यास मदत होते. या व्हिडीओचे रिझल्ट्स खूप चांगले मिळत आहेत. हा व्हिडीओ गेम फक्त 10 मिनिटांचा आहे.हा गेम खेळत असलेल्या व्यक्तींना फॅट्स आणि काबोर्हायड्रेट्ससंबंधित तसेच फळे आणि भाज्यांचे काही फोटोज सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. फॅट्स आणि काबोर्हायड्रेट्स सिलेक्ट केल्या केल्या लगेचच थांबण्याचा मॅसेज येतो. त्याव्यतिरिक्त पुन्हा फॅट्स आणि काबोर्हायड्रेट्स निवडले गेले तर पॉर्इंट्स कमी होतात.त्याऐवजी जर न्युट्रीयंट्स सिलेक्ट केले गेले तर पॉइंट्स वाढतात. आठवड्यातून किमान तीन वेळा हा गेम खेळण्याचा सल्ला दिला जातो.