(Image Credit : The Girl Sun)
सद्या अनेकजण वेगळा लूक मिळवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत आहेत. कुणी वेगळ्या डिझाइनचे कपडे ट्राय करतात तर कुणी केस वाढवतात. तेच आजकाल तरुणांमध्ये वेगवेगळ्या स्टाइलची दाढी ठेवण्याचा ट्रेन्ड आला आहे. याला बिअर्ड लूक म्हणतात.
सध्याचा काळ हा फॅशनचा आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणांमध्ये दाढीपासून वेगवेगळ्या फॅशन बघायला मिळतात. तरुण जास्तकरुन दाढी असलेला लूक करताना दिसतात. पण अशातच दाढीबाबत एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. याने दाढी लूक ठेवावा की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल.
द सन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार एका रिसर्चनुसार, तरुणांच्या दाढीमध्ये कुत्र्यांच्या केसांमध्ये आढळतात त्याहूनही घातक बॅक्टेरिया आढळले आहेत. हे बॅक्टेरिया व्यक्तीला आजारी पाडण्यासाठी पुरेशे आहेत. रिसर्चमधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, मनुष्यांनाही कुत्र्यांच्या माध्यमातून होणारे रोग होण्याचा धोका आहे की नाही? या रिपोर्टनुसार, टेस्ट करण्यासाठी एमआरआय स्कॅनरचा वापर केला गेला.
या रिसर्चमध्ये १८ टक्के दाढीवाल्या व्यक्तींचे सॅम्पल घेण्यात आले. तर ३० कुत्र्यांच्या गळ्याच्या केसांचेही सॅम्पल घेण्यात आले. तपासणीतून असं समोर आलं की, मनुष्याच्या दाढीमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियाचं प्रमाण कुत्र्यांच्या केसांमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियांपेक्षा अधिक आहे.
रिसर्चमध्ये ज्या पुरुषांना सहभागी करुन घेण्यात आले होते त्यांचं वय १८ ते ७६ दरम्यान होतं. तर ३० कुत्र्यांपैकी २० मध्ये फार जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आढळलेत, तर ७ लोकांमध्ये मनुष्याच्या आरोग्यासाठी घातक जीवाणू आढळलेत. हे बॅक्टेरिया व्यक्तीला गंभीर आजारी करु शकतात.