शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मिठाचं पाणी वापराल, तर महागडे प्रॉडक्ट्स विसराल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:11 IST

त्वचेसाठी मिठाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं कारण मीठ हे एक नैसर्गिक मिनरल आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

त्वचेसाठी मिठाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं कारण मीठ हे एक नैसर्गिक मिनरल आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मीठ ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. जर तुम्ही साध्या मिठाऐवजी समुद्री मिठाचा वापर करत असाल तर हे अत्यंत उपयोगी ठरतं. मीठ त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मिठाच्या पाण्यामध्ये मिनरल्स म्हणजेच कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडियम इत्यादी तत्व आढळून येतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात. जाणून घ्या सौंदर्य वाढविण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या वापराबाबत काही टिप्स...

मिठाच्या पाण्याचे फायदे :

पिपल्सपासून सुटका

पिंपल्सच्या प्रॉब्लेम्सने त्रस्त असाल तर मिठाच्या पाण्याचा वापर करा. मिठाच्या पाण्यामध्ये असलेल्या हिलिंग प्रॉपर्टिज त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही पिंपल्समुळे कंटाळल्या असाल तर, त्यासाठी एक कप पाण्यामध्ये एक चमचा समुद्री मीठ एकत्र करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर चेहरा पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. 

त्वचेला एक्सफोलिट करा

(Image Credit : dermstore.com)

त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मिठाच्या रफ टेक्स्चरमुळे त्वचेला व्यवस्थित एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतं. मीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. मिठाचे प्रमाण जास्त ठेवून हळूहळू त्वचेवर मसाज करा. 

त्वचेवर कापल्यानंतर

मिठामध्ये अ‍ॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेवर कापलं तर ठिक करण्यासाठी मदत करतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने बॅक्टेरियाला मारल्याने मदत मिळते. त्याचबरोबर त्वचेवरील जखम लवकर भरून येण्यास मदत होते. 

त्वचा उजळवण्यासाठी 

(Image Credit : lifealth.com)

त्वचेचा मूळ रंग जाऊन काळवंडली असेल तर त्वचेला बाहेरील पोषणासोबतच आतूनही पोषण देण्याची गरज असते. त्यासाठी दररोज हलक्या गरम पाण्यामध्ये एक चमचा साधं मीठ एकत्र करा. यामुळे शरीर डिटॉक्सीफाय होण्यास मदत होते. सूज कमी होते त्याचबरोबर त्वचा उजळण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स