टेंशन घेत असाल तर त्वचेसाठी पडू शकतं महागात...जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:04 PM2019-12-15T18:04:15+5:302019-12-16T09:30:33+5:30

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात ताण-तणावांचा सामना करावा लागतो.

Know how mental stress can affect to skin | टेंशन घेत असाल तर त्वचेसाठी पडू शकतं महागात...जाणून घ्या कसं

टेंशन घेत असाल तर त्वचेसाठी पडू शकतं महागात...जाणून घ्या कसं

googlenewsNext

(Image credit-estetica.elbierzodigital.com)

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात ताण-तणावांचा सामना करावा लागतो. अर्थात प्रत्येकाला असलेल्या टेंशनमागे वेगवेगळी कारण असतात. खास करून महिलांना जर ताण-तणावाचा सामना करावा लागत असेल तर ते चेहऱ्यावर लगेच दिसून येत असतं. काही महिलांना नोकरीचं तर काहींना घरखर्चाचं तसंच वैवाहीक जींवन अनकूल नसणे. अशा प्रकारची ताण-तणावाची कारणं असू शकतात. ज्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर तसंच त्वचेवर सुध्दा घडून येत असतो. शिवाय खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास अधिक प्रमाणात शरीराचं नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या कसं.


(Image credit- goqii.com)

पिंपल्स जास्त येतात 

(image credit-noticierovenevision.net)

तुम्ही कधी निरिक्षण केलं आहे का संतुलीत आहार घेऊन आणि त्वचेची योग्य रोजच्या रोज काळजी घेत असाल तरीही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. याचं कारण म्हणजे तुम्ही जर जास्त टेंशन घेत असाल तर अशी समस्या उद्भवते. तुम्ही घरच्या गोष्टींचं तसंच ऑफिसच्या कामाचं गरजेपेक्षा जास्त टेंशन घेतलं की त्याचा परीणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसायला सुरूवात होते. महिलांच्या आयुष्यातला ताण- तणाव वाढल्यास झोप येणे, चिडचिड होणे, चेहऱ्यावर डाग पडणे अशी लक्षणं दिसायला सुरूवात होते.

सोरायसिस

(image credit-aweita.larepublica.p)

चेहऱ्यावर तसंच मानेवर लाल चट्टे पडणे हे सोसायसीसचे लक्षण असू शकतं.  जास्त ताण घेतल्याने त्वचेशी निगडित ही समस्या उद्भवते. यात इन्फेक्शन झालेल्या भागाला खाज येते. तसंच त्वचा जळजळते. नाकावर तसंच गळ्यावर सुध्दा सोसायसीसची समस्या निर्माण होऊ  शकते.

त्वचा कोरडी पडणे- 

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा कोरडी पडते. ज्यावेळी ही समस्या मोठी होते तेव्हा त्वचा निस्तेज व्हायला सुरुवात होते. ताण अधिक प्रमाणात घेतल्यास त्वचेवरच नाही तर शरीरतील संपूर्ण अवयवांवर याचा परीणाम होत असतो.

सतत आजारी पडणे

(image credit- rinkykapoor.com)

ताण-तणावचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवर होत असतो. त्यातून प्रचंड शारीरिक थकवा, दमणे, मन एकाग्र न होणे, त्याशिवाय ताणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश, केस गळणे, पोट बिघडणे इत्यादी अशा तक्रारी सुरू होतात.

Web Title: Know how mental stress can affect to skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.