(Image Credit : letstalkbeauty.com)
वाढत्या वयासोबतच कपाळावर सुरकुत्या दिसू लागतात. ज्या दूर करणं जरा कठिण काम आहे. कपाळावर सुरकुत्या येण्याचं कारण वाढत्या वयासोबतच तणाव हेही आहे. कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी काही लोक कॉस्मेटिक सर्जरी करतात. ज्याचे अनेक दुष्परिणामही होतात. पण जर तुम्हाला कॉस्मेटिकचा वापर न करता या सुरकुत्या दूर करायच्या असतील तर काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागेल. अशाच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) पपई - वाढत्या वयाची लक्षणे रोखण्यासाठी पपई फार फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये पॅपेन नावाचं एंजाइम असतं. जे कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करतं. याचा वापर करण्यासाठी १ चमचा पपईचा गर कपाळावर लावून स्क्रब करा. काही वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित करून कपाळावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.
२) खोबऱ्याचं तेल - खोबऱ्याचं तेल त्वचेला मॉइश्चर करण्यास मदत करतं. खोबऱ्याच्या तेलात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेला निर्जीव करणाऱ्या आणि सुरकुत्याचं कारण असणाऱ्या अॅक्टिविटी कमी करतात. याचा वापर करण्यासाठी तेलाचे काही थेंब घेऊन कपाळाची मालिश करा. जोपर्यंत त्वचा तेल शोषूण घेत नाही तोपर्यंत मालिश करा.
३) ऑरेंज पील पावडर - कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी सिट्रस फेसपॅक फार फायदेशीर मानले जातात. याचा वापर करण्यासाठी १ चमचा ऑरेंज पील पावडरमध्ये १ चमचा गुलाबजल मिश्रित करा. हा फेसपॅक साधारण १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
४) ऑलिव ऑइल - ऑलिव ऑइलमध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन इ आणि त्वचेसाठी फायदेशीर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. याने कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत मिळते. यासाठी १ छोटा चमचा ऑलिव ऑइलने कपाळावर मसाज करा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी झोपेतून उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
५) अननस - अननसात ब्रोमेलिन आणि व्हिटॅमिन असतात, जे कपाळावरील सुरकुत्या दूर करतात. याचा वापर करण्यासाठी अननसाचा ताजा रस काढून कापसाच्या मदतीने कपाळावर लावा. हा रस १५ मिनिटे कपाळावरच लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.
(टिप : वरील सगळे उपाय घरगुती आहेत. ते फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. तसेच उपायाची आधी हातावर पॅच लावून टेस्ट करावी. कारण काहींना वरीलपैकी काही गोष्टींची अॅलर्जी असू शकते.)