शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरची चरबी हटवण्यासाठी असा करा व्यायाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 17:57 IST

सुंदर दिसायला सगळ्यांना आवडत असतं. वजन वाढल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यावर दिसत असतो.

सुंदर दिसायला सगळ्यांना आवडत असतं. वजन वाढल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यावर दिसत असतो. गालावरची आणि इतर भागांची चरबी वाढतं असते. तसंच चेहऱ्यावरची  चरबी वाढली तर आपण आहोत त्यापेक्षा लठ्ठ दिसू लागतो. त्यामुळे वजन कमी करणं हे मोठं आवाहन होऊन बसतं. तुम्ही सुध्दा या  समस्येमुळे त्रस्त असाल तर काही टिप्स तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्की उपयोगी ठरतील.

जर तुम्हाला चेहरा आणि त्याच्या आजूबाजूची चरबी कमी करायची असेल तर कार्डीओ एक्सरसाईज करणं फायदेशीर आहे. त्यात  सायकलिंग तसंच धावणे यांचा समावेश असतो. यासोबतच चेहऱ्याचा व्यायामसुध्दा करणं गरजेचं आहे.  गालांचा आकार कमी करण्यासाठी काही व्यायाम तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. 

गालांचा व्यायाम

तोंडाने श्वास घ्या आणि काही सेकंदांकरिता तुमचे दोन्ही गाल फुगवा. आता तोंडाने श्वास सोडून द्या आणि हे असे ८-१० वेळा पुनःपुन्हा करा.हा व्यायाम तुमच्या गालाच्या स्नायूंना मजबूत करतो आणि त्यांना बारीक होणे आणि पोकळ दिसणे यापासून प्रतिबंध करतो. जेव्हा तुम्ही एखादा स्नायू एका विशिष्ठ पद्धतीने वापरता तेव्हा त्याने चेहऱ्याचे दिसणे एकदम पालटून जाते. म्हणून कमनीय आणि गूूबगुबीत गालांसाठी हा व्यायाम करा.

डोळ्यांचा व्यायाम

डोळे एवढे मोठे करून पाहा की डोळ्यातील पांढरा भाग जास्तीत जास्त उघडा होईल. नंतर डोळे एकदम घट्ट बंद करा. पुन्हा एकदम मोठे करा. आणि पुन्हा घट्ट बंद करा. डोळ्यातून पाणी येईपर्यंत हे असे वेगाने करीत राहा. आता डोळे बंद करा आणि आराम करा. हा व्यायम ३ ते ४ मिनिटे करा. हा व्यायाम केल्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आणि कपाळाच्या भोवतालच्या स्नायूंना व्यायाम देत आहात.

हनूवटीचा व्यायाम 

हनुवटीला दोन्ही हातांमध्ये अशा पद्धतीने धरा की हाताचे दोन्ही अंगठे हनुवटीच्या खाली येतील. केवळ अंगठ्यांच्या सहाय्याने हनुवटीला खालच्या बाजूने दाबत दाबत वरच्या दिशेने या. असे २-३ मिनिटे करा. या व्यायामामुळे  मलावरोधापासून सुटका मिळते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच अपचनाच्या त्रासापासून ही सुटका होते.  तसंच  चेहरा नाजूक दिसण्यास मदत होते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य