शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

या फळाने वर्षानुवर्ष टिकेल तुमचं तारुण्य, सुरकूत्यांची समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:35 IST

हिवाळ्यात सुंदर चमकदार त्वचा  सगळ्यांनाच हवी असते.

हिवाळ्यात सुंदर चमकदार त्वचा  सगळ्यांनाच हवी असते. पण वातावरणात होणारा बदल, प्रदूषण, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यांमुळे शरीरावर नकारात्मक परीणान घडून येत असतात. तसंच चेहऱ्याला पुळकुट्या येणं, मुरूमं  येणं, त्वचा निस्तेज होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्हालाही त्वचेच्या या समस्यांचा सामना करावा  लागत असेल तर तुम्ही हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या या फळाचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ड्रॅगन फ्रुटचे त्वचेला होणारे फायदे.

ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे चांगला उपाय आहे. यात भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह आढळून येते.

त्वचेवर तयार होणारे फ्रि रेडिकल्स चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करतात. तसंच वयवाढीची लक्षणं सुध्दा दिसायला सुरूवात होते. यासाठी ज्या घटकांमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सीडंटस असतात. अशा फळांचा आहारात समावेश करावा. तसंच  ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात  अ‍ॅन्टी ऑक्सीडंटस आढळून येतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकूत्या नियंत्रणात राहतात. त्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रुटचं सेवन करण्याव्यतिरीक्त त्याचा फेसपॅक सुध्दा चेहऱ्याला लावू शकता. 

यासाठी ड्रॅगन फ्रुटमध्ये मध घालून फेसपॅक बनवून घ्या. आणि नियमीत चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकूत्या कमी होतात. तसंच त्वचा चमकदार दिसेल. वेळे आधीच चेहरा जास्त वयस्कर दिसायला लागत असेल तर हा फेसपॅक वापरल्यास फरक दिसून येईल.

ड्रॅगन फ्रुटचा फेसपॅक तयारसाठी ड्रॅगन फ्रुट कापा. त्यानंतर त्यामधिल प्लप काढून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्यात दही घाला आणि हे मिश्रण एकत्र करून घ्या. अशाप्रकारे ड्रॅगन फ्रूटचा फेसपॅक तयार करुन झाल्यानंतर मान आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. २ आठवडे हा प्रयोग केल्यानंतर त्वचेत फरक दिसून येईल.

 

(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स