जिम असते बॅक्टेरिआचा अड्डा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 15:50 IST
जिममध्ये असणारी प्रत्येक वस्तू वस्तू बॅक्टेरिआने माखलेली असते.
जिम असते बॅक्टेरिआचा अड्डा!
निरोगी, सदृढ, सुडौल शरीर कोणाला नकोय? व्यायाम करा, व्यायाम करा, असे सगळेच सांगत असतात. आपल्यालाही वाटते की, रोज सकाळी व्यायाम केला पाहिजे. जेव्हा ३६ नंबरची पँटसुद्धा टाईट व्हायला लागते तेव्हा तर ‘जिम लावनूच टाकतो’ असा विचार येतो. आणि काही जण जिम लावतातसुद्धा.ही बातमी वाचून जिममध्ये असणाºया विविध आद्यावत मशीन आणि वस्तूंना हात लावण्यापूर्वी तुम्ही हजार वेळेस विचार करणार. कारण जिममध्ये असणारी प्रत्येक वस्तू वस्तू बॅक्टेरिआने माखलेली असते. ‘फिट्रेटेड’ने केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली.जिममधील 27 उपकरणांची त्यांनी तपासणी केली असता प्रत्येक उपकरणाच्या एका चौरस इंचावर दहा लाखांपेक्षा जास्त रोगजंतू आढळून आले. आणि या रोगजंतूमध्ये 70 टक्के बॅक्टेरिआ आपल्या आरोग्याला प्रचंड हानीकारक आहेत.तुलना करून सांगायचे झाले तर, टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त जंतू ‘फ्री वेट’वर असतात आणि सार्वजनिक नळापेक्षा 74 पट जास्त बॅक्टेरिआ ट्रेडमिलवर असतात. असे असेल तर जिममध्ये वर्कआऊट केल्यावर लगेच सॅनिटायझरने हात निर्जंतूक केले पाहिजेत.