शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

आता महागड्या क्रिम्स लावणं विसरा; बर्फाच्या तुकड्यांनी ५ मिनिटांत ग्लोइंग स्किन मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:31 IST

काही महिला  दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यातून एकदा पार्लरला जातात. खूप पैसै मोजून केमिकल्सयुक्त ट्रिटमेंट्स करतात. खूप कमी महिला आपली त्वचा चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात.  

चमकदार आणि उजळदार चेहरा सगळ्यांनाच हवा असतो. त्यासाठी त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. आहार चांगला घेण्याबरोबरच पाणी भरपूर प्यावं लागतं. काही महिला  दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यातून एकदा पार्लरला जातात. खूप पैसै मोजून केमिकल्सयुक्त ट्रिटमेंट्स करतात. खूप कमी महिला आपली त्वचा चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात.  

त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी फेशियल आणि मसाज करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स घ्यायला हव्यात असं काहीही नाही. घरच्याघरी बर्फाचा वापर करून तुम्ही कमी वेळात उजळदार चेहरा मिळवू शकता. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे तुलनेनं त्वचेवर कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.  

तुम्ही  बराचवेळ लॅपटॉपवर काम करत असाल तर डोळ्यांना थकवा येतो. त्यासाठी डोळ्यांवर बर्फाचा तुकडा कापडात बांधून डोळ्यांच्या आजूबाजूला आणि डोळ्ंयावर फिरवा. त्यामुळे ताण येणार नाही. डोळ्यांवरील डार्क सर्कल्स कमी होतील. एक दिवसाआड हा उपाय केल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होतील.

थकलेल्या अवस्थेत असाल तर ताजं तवानं झाल्याप्रमाणे वाटेल.  बर्फाने मसाज केल्यास त्वचेवरील काळे डाग कमी होतात. यामुळे टॅनिंगचा प्रॉब्लेम दूर होतो.  घामोळ्यांच्या ठिकाणी बर्फाने मसाज केल्याने शरीराचे तापमान कमी होते. यामुळे उष्णता दूर होते आणि घामोळ्या कमी होतात. 

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाच्या तुकड्यानं तोंडाला हलक्या हातानं मसाज करावा. त्वचेवर बर्फ रगडू नये. यामुळे छिद्रांचा आकार कमी होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडते.

उन्हाळ्यात सूर्याच्या घातक किरणांमुळे सनबर्नचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. यामुळे आपली त्वचा काळी पडू लागते. सोबतच त्वचेवरील तेज कमी होऊ लागतं. बर्फाचा वापर नियमित केल्यानं त्वचा चांगली आणि ताजीतवानी राहील. 

बर्फाचे काही तुकडे घेऊन तुम्ही चेहऱ्याची मसाज केल्यानं रक्ताभिसरण चांगले राहते. त्यासाठी साध्या पाण्याचे बर्फ तयार करण्यापेक्षा कोरफड जेल किंवा दुधापासून आइस क्युब तयार करून घ्या. बर्फ तयार झाल्यानंतर हलक्या हातानं चेहऱ्याचा मसाज करावा.  त्यामुळे त्वचा डागरहीत आणि ग्लोईंग दिसेल. 

हे पण वाचा-

त्वचेवरील सक्रिय किटाणूंमुळे पाठीवर दाण्यांसारखे डाग पडतात; 'या' घरगुती उपायांनी ठेवा दूर

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी