शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 11:18 IST

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच.

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच. लिपस्टिक लावताना जरासाही हात इकडे तिकडे गेला तर पूर्ण मेकअप बिघडू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला रेड लिपस्टिक लावण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. त्या फॉलो करून तुम्ही व्यवस्थित लिपस्टिक लावू शकता. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. 

रेड लिपस्टिक परफेक्ट पद्धतीने लावण्यासाठी खाली दिलेल्या 7 गोष्टी गरजेच्या आहेत...

1. लिप बाम2. रेड लिपस्टिक3. लिप लायनर ब्रश4. लिप ब्रश5. कंसीलर6. फेस पाउडर7. टिश्यू पेपर

स्टेप 1:सर्वात आधी आपल्या ओठांवर बोटांच्या मदतीने लिप बाम लावा. काही वेळानंतर ओठ सुकू लागतील, त्यानंतर टिश्यू पेपरच्या मदतीने हलक्या हाताने ओठांवरील लिप बाम पुसून टाका.

स्टेप 2:लिप बाम काढून टाकल्यानंतर ओठांवर थोडी पावडर लावा. पण जास्त पावडर लावू नका, नाहीतर लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर पॅचेस दिसून येतील.

स्टेप 3:आता लिप ब्रशवर लिपस्टिक घ्या आणि ती ओठांवर लावा. ओठ मोठे दाखवायचे असल्यास लिपस्टिक लावण्याआधी ओठांचा शेप लिप पेन्सिलच्या मदतीने अंडरलाइन करून घ्या. त्यानंतर लिपस्टिक लावा. 

स्टेप 4:लिपस्टिक लावून झाल्यानंतर लिप पेन्सिल किंवा लिप लाइनर ब्रशच्या मदतीने ओठांना परफेक्ट शेप द्या. 

स्टेप 5:आता एक टिशू पेपर घ्या आणि ओठांमध्ये ठेवून ओठ त्यावर प्रेस करा. असं केल्याने लिपस्टिक लावताना ओठांवर जे पॅचेस पडतात ते टिशू पेपरला लागतील आणि निघून जातील. त्यामुळे ओठांना एक स्मूथ फिनिश मिळण्यास मदत होईल.

स्टेप 6 :एका ब्रशवर कंसिलर घ्या आणि दोन्ही ओठांच्या किनाऱ्यांवर तसेच लिपस्टिक ओठांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लागली असेल तर तिथे हे कंसिलर लावा. 

स्टेप 7:त्यानंतर लिपस्टिक दातांवर तर लागली नाही ना? हे चेक करा. तसे असल्यास टिशू पेपरच्या मदतीने दातांवर लागलेली लिपस्टिक पुसून टाका. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन