शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

ब्लॅकहेड्समुळे झालात हैराण? तांदळाच्या पिठाचा 'असा' वापर करा, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:19 IST

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असणं त्वचेशी संबंधित सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. धूळ, घाम आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स येतात.

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असणं त्वचेशी संबंधित सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. धूळ, घाम आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स येतात. धूळ एकाजागी जमा झाल्याने ब्लॅकहेड्स तयार होतात, जे वेळोवेळी दूर करणे गरजेचं असतं. हे ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्रीम, फेस मास्क आदींचा वापर करतात. यातीलच एक घरगुती उपाय म्हणजे तांदळाचं पीठ. त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषूण घेण्यासाठी ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करता येऊ शकतो. चला जाणून घेऊ कसा करावा वापर...

दही आणि तांदळाचं पीठ

(Image Credit : boldsky.com)

दही आणि तांदळाचं पीठ चांगल्याप्रकारे मिश्रित करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर कमीत कमी अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा. नंतर हळूहळू हलक्या हाताने स्क्रब करा आणि चेहरा पाण्याचे स्वच्छ करा.

अ‍ॅलोवेरा आणि तांदळाचं पीठ

ताजं अ‍ॅलोवेरा जेल घेऊन त्यात तांदळाचं पीठ मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हळूहळू चेहऱ्यावर स्क्रब करा. याने ब्लॅकहेड्स मुळातून काढण्यासाठी मदत होईल. कमीत कमी १० मिनिटांपर्यंत थांबा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

संत्र्याच्या सालीचं पावडर आणि तांदळाचं पीठ

(Image Credit : springwise.com)

संत्र्याच्या सालीचं पावडर आणि तांदळाचं पीठ लावल्याने ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यास मदत मिळते. यासाठी संत्र्याच्या सालीचं पावडर, तांदळाचं पीठ, गुलाबजल आणि बेसन घ्या. यांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तशीच चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा चांगल्याप्रकारे स्क्रब करा. काही वेळाने चेहरा धुवा.

साखर आणि तांदळाचं पीठ

तांदळाच्या पिठात मध, साखर आणि बेसन मिश्रित करा. याची पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. जवळपास १० मिनिटांपर्यंत पेस्ट चेहऱ्यावर लावूनच ठेवा. नंतर चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब करा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवा.

(टिप : वरील उपाय आणि सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा किंवा पेस्टची आधी टेस्ट घ्यावी. काही साइड इफेक्ट झाले नसतीलच चेहऱ्यावर लावावी.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स