शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, काही दिवसात दिसेल फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 10:56 IST

Alum for dark neck : अनेकांना हे माहीत नाही की, त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी कामात येऊ शकते. तुरटीमध्ये मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते.

Alum for dark neck : अनेक लोकांबाबत हे बघितलं जातं की, त्यांच्या पूर्ण शरीराची त्वचा ही गोरी असते, पण मानेच्या आजूबाजूचा भाग डार्क किंवा काळा असतो. मानेची त्वचा काळी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. उन्हात जास्त राहणे, केसांमधून येणारा घाम, तेल,  धूळ, जेनेटिक, लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस, एलर्जी इत्यादी काही कारणे सांगता येतील. मानेचा हा काळपटपणा लपवण्यासाठी लोक नको नको ते करतात आणि वेगवेगळे क्रीम व उपाय करतात. पण त्यांना फायदा मिळतोच असं नाही. 

मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी कामात येऊ शकते. तुरटीमध्ये मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. लोक त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर करत असतात. फक्त तुम्हाला याच्या वापराची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. 

तुरटीचे फायदे

तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बायोटिक, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी, त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुरटीमुळे त्वचा उजळते आणि त्वचेची आतून सफाई होते. 

तुरटीने मानेचा काळपटपणा दूर कसा कराल?

मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा तुरटीचं पावडर घ्यायचं आहे आणि त्यात समान प्रमाणात मुलतानी माती टाकायची आहे. त्यानंतर यात गुलाब जल आणि १ ते २ चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे. याची चांगली पेस्ट तयार करा. पेस्ट मानेवर आणि शरीरावर जिथे काळे डाग आहेत तिथे लावा. १५ ते २० मिनिटे ही पेस्ट तशी राहू द्या. 

जेव्हा ही पेस्ट चांगली कोरडी होईल तेव्हा साध्या पाण्याने त्वचा धुवून घ्या. फक्त मान धुताना साबणाचा वापर करू नका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा किंवा रात्री झोपण्याआधी हा उपाय करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

दुसरा उपाय

त्याशिवाय मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी तुरटी, बेकिंग सोडा आणि गुलाब जल यांचं एक मिश्रण तयार करा. हे मानेवर लावा आणि काही वेळाने धुवून टाका. यानेही तुम्हाला फायदा मिळू शकतो.

तुरटीचे त्वचेला होणारे फायदे

- टूथपेस्ट आणि माउथफ्रेशसारख्या गोष्टींमध्ये तुरटीचा वापर केल्याने हिरड्यांवरील सूज कमी होते आणि तोंडातील बॅक्टेरियाही नष्ट होतात.

- तुरटी त्वचेसाठी रामबाण उपाय मानली जाते. याने पिंपल्स आणि त्वचेवरील फोड दूर करण्यास मदत मिळते. तुरटीमुळे त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. 

- रोज आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी फिरवली तर तुम्हाला फायदा मिळेल. कारण याने तुमच्या शरीराची दुर्गंधी लगेच दूर होईल.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी