शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सलोनमध्ये ऊर्जा बचत कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:02 IST

सलोनमध्ये ऊर्जा बचत कशी कराल? सर्वसाधारणपणे फायदा म्हणजे खर्च वगळता मिळालेले उत्पन्न. सलोनमध्ये सर्वाधिक खर्च हा विजेवर केला जातो. या ठिकाणी ऊर्जेची बचत ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यात ऊर्जेचे महत्त्व आपणास लक्षात येईल. या ठिकाणी सलोनमध्ये उर्जेवरील खर्च कसा कमी करावा याची माहिती देत आहोत....

सर्वसाधारणपणे फायदा म्हणजे खर्च वगळता मिळालेले उत्पन्न. सलोनमध्ये सर्वाधिक खर्च हा विजेवर केला जातो. या ठिकाणी ऊर्जेची बचत ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यात ऊर्जेचे महत्त्व आपणास लक्षात येईल. या ठिकाणी सलोनमध्ये उर्जेवरील खर्च कसा कमी करावा याची माहिती देत आहोत....तुमच्याकडे असणारे सर्व कर्मचारी आणि सदस्यांना या प्रयोगात सामील करुन घ्या. यामुळे तुमच्या सलोनच्या वीज खर्चाच्या रकमेत बचत व्हावी या उद्देशाने अधिक प्रयत्न करता येतील. तुमच्या कर्मचाºयांना व्यवसायाचे महत्व समजावून सांगा. तुमच्याप्रमाणेच त्यांचीही बचत करण्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आणून द्या आणि त्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण द्या.या वेळी पर्यावरणीय प्रश्नांबाबत जाणीव जागृती करा. पर्यावरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असावा या संदर्भात सांगितल्यानंतर त्यांनाही याकडे अगदी सहज पद्धतीने पाहता येईल व काम करता येईल. यामुळे खर्चाच्या बचतीत होणारा मोठा परिणाम त्यांना अनुभवता येईल. पाणी आणि उर्जेची बचत आणि त्याचे फायदे भविष्यात कशा पद्धतीने केले जाईल यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करा.पाण्याचा वापर टाळा. प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा असून, शाम्पू एरियामध्ये जेव्हा तुम्हाला गरज असेल, त्यावेळेसच पाणी सोडा. त्याशिवाय ग्राहकांसाठी शाम्पू करीत असताना उगीचच पाण्याचा वापर करु नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पुढच्या काळात उपयोगी पडू शकतात.सलोनमध्ये इकोफ्रेंडली डिसपोजेबल टॉवेल्सचा वापर करा. यामुळे तुमच्या खर्चातही बचत होईल. हे पुनर्चक्रीकरण पद्धतीने तयार करण्यात आले असले पाहिजेत. वॉशिंग मशीन आणि ड्रायरमुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो.सलोनमध्ये प्रकाश केव्हा असावा यासंदर्भात टाईम सेट करा. नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष द्या. त्यासाठी मोठ्या खिडक्या, ऊर्जा बचत करणारे बल्ब वापरा. उपकरणाशेजारील स्वीच बंद न करता मेन स्वीचपासून मशीन बंद करा.जुनी उपकरणे वापरु नका. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्ची पडते. एअर कंडीशनर, फ्रीज, ड्रायर हे वेळोवेळी बदला. जुन्या उपकरणांचा फारसा वापर करु नका.सुनीता मोटवानी-माखिजाआंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सल्टंट