शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या 'या' उपायांनी नक्की होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 14:35 IST

हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी बॉडी लोशन असेल किंवा कोणतीही क्रीम असेल अशी वेगवेगळी उत्पादनं वापरत असतो.

हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी बॉडी लोशन असेल किंवा कोणतीही क्रीम असेल अशी वेगवेगळी उत्पादनं वापरत असतो. पण केसांकडे दुर्लक्ष होत असतो. बदलत्या वातावरणात पोषक घटकांची कमतरता भासत असल्यामळे  केस मोठ्या प्रमाणात गळत असतात.  गळण्यासोबतच फाटे फुटणे आणि  कोंडा तयार होण्याची समस्या उद्भवते. 

यावर उपाय म्हणून आपण महागड्या उत्पादनांना प्राधान्य देतो. पण त्याचा सुध्दा काही उपयोग होत नाही.  केसांमध्ये अधिक केमिकल्सचा वापर केल्यास देखील केसगळती जास्त प्रमाणात होते. तुम्ही सुद्धा या  कारणाने जर हैराण झाला असाल तर तुम्ही काही घरगूती टीप्सचा वापर करून चांगले केस मिळवू शकता.

केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर योग्य प्रकारे करायला हवा. नारळाच्या तेलात ३ ग्राम कापूर  दळून घाला. हे तेल रोज रात्री केसांना लावून केसांच्या मुळांची मसाज करा. दररोज या तेलाने मसाज केल्यास  फरक दिसून येईल. तसंच  केल मऊ आणि मुलायम होतात. 

केस गळणं थांबवण्यासाठी ५ टेबसस्पून मेंहेदीची  पाऊडर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस तसंच  १ अंड्याचा पांढरा भाग आणि १ टेबलस्पून मेथी, ४ टेबलस्पून आणि दही घालून  रात्रभर भिजवा आणि केसांना लावा. त्यानंतर २-३ तासांनी केस धुवून टाका असे केल्यास फरक दिसून येईल. केस चमकदार दिसतील. 

कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा. त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा. एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

 केसांना पोषण मिळण्यासाठी अर्धा कप दही घ्या आणि त्यात २ टेबलस्पून मेधी घाला. तसंच ३ आवळे त्यात मिसळा. सकाळी याची पेस्ट तयार करून  केसांना लावा.  हे मिश्रण लावल्यानंतर केसांना २ ते ३ तास राहू  दया असे केल्यास केस कोरडे पडणार नाहीत.  तसंच लिंबाचा रस आणि नारळाचं तेल मिसळून केसांना लावा आणि २ तासांनी केस धुवून टाका. यामुळे केस  गळण्याच्या  समस्येपासून आराम मिळेल. तसंच केस घनदाट दिसतील. घरगुती साहीत्याचा वापर करून जर तुम्ही केसांची काळजी घेतली तर तुम्हाला  केमिकल्सचा वापर न करता चांगले केस मिळवता येतील.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स