शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील लिपस्टिकला म्हणा बाय-बाय; घरीच तयार करा ओठांसाठी फायदेशीर लिपस्टिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 12:00 IST

आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील स्किनच्या समस्या दूर करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतंच पण ओठांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते.

आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील स्किनच्या समस्या दूर करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतंच पण ओठांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते. चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते.

महिलांच्या मेकअप किटमध्ये असणारं सर्वात महत्वाचं प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक. ओठांचं सौंदर्य खुलवण्यासाठी विविध रंगाच्या आणि प्रकारांच्या लिपस्टिक वापरण्यात येतात. बाजारामध्ये विविध ब्रँडच्या लिपस्टिक आढळून येतात. परंतु या लिपस्टिक तयार करण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यातील काही केमिकल्स ओठांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. ओठांचा रंग काळपट होणं, स्किन खराब होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजारातील लिपस्टिकऐवजी तुम्ही घरच्या घरी लिपस्टिक तयार करू शकता. त्यासाठी बीटाचा उपयोग करणं फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्व स्किनचा काळपटपणा दूर करून मूळ रंग पर आणण्यास मदत करतात. जाणून घेऊयात घरच्या घरी सोप्या पद्धतीने लिपस्टिक तयार करण्याबाबत...

साहित्य :

  •  एक बीट 
  • खोबऱ्याचं तेल 
  • मिक्सर
  • गाळणी
  • छोटी वाटी (काचेची)

बीटापासून लिपस्टिक तयार करण्याची कृती :

- सर्वात आधी बीट धुवून त्याची साल काढा. त्यानंतर त्याचे छोटे छोट तुकडे करून मिक्सरमधून बारिक करून घ्या. त्यामध्ये पाणी टाकू नका. 

- तयार झालेली पेस्ट एका काचेच्या वाटीमध्ये काढून घ्या. पेस्ट पूर्ण बारिक झाली आहे याची खात्री करून घ्या. 

- वाटीमध्ये काढलेल्या पेस्टमध्ये एक चमचा नारळाचं तेल मिक्स करा. फार कमी तेल टाकलं तर लिपस्टिक ड्राय होईल त्यामुळे एक चमचा किंवा थोडं जास्त तेल मिक्स करू शकता. 

- पेस्टमध्ये नारळाचं तेल मिक्स करण्यासाठी चमच्याचा किंवा टूथपिकचा वापर करा. त्यानंतर ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा. 

- फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ही पेस्ट थोडी घट्ट झाल्यावर एखाद्या लिपबामच्या कंटेनरमध्ये काढून घ्या. 

- कंटेनरमध्ये काढल्यानंतर पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून द्या. साधारणतः 2 ते 3 तासांनंतर तुम्ही ही लिपस्टिक वापरू शकता. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य