वाढत्या वयात 'या' पदार्थाचे सेवन कराल तर तारूण्य राहील टिकून 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:52 PM2020-01-03T12:52:04+5:302020-01-03T12:59:46+5:30

गेल्या काही वर्षापासून मशरूम हा पदार्थ सगळ्याच लोकांच्या खाण्यात येत असतो.

How to control ageing sings on the face by using mashroom | वाढत्या वयात 'या' पदार्थाचे सेवन कराल तर तारूण्य राहील टिकून 

वाढत्या वयात 'या' पदार्थाचे सेवन कराल तर तारूण्य राहील टिकून 

Next

काही वर्षांपासून मशरूम हा पदार्थ सगळ्याच लोकांच्या खाण्यात येत असतो. कारण जर तुम्ही हॉटेलमधून एखादा पदार्थ मागवला किंवा जेवण्यासाठी बाहेर गेलात तर अनेक डिशेस या मशरूम पासून तयार झालेल्या असतात. तसंच त्यांची चव सुध्दा अप्रतिम असते. एवढेच नाही तर पिझ्झा खायला सगळ्यांनाच आवडत असतो. त्यात सुध्दा मशरूमचा वापर करून चविष्ट फ्लेवर तयार केला जातो.  तसंच मॅकरोनी, आणि पास्तामध्ये सुद्धा याचा वापर करतात.  मग तुम्हाला माहीत आहे  का वेगवेगळ्या पदार्थांना चव देणारे मशरूम हे आरोग्यासाठी खूप  लाभदायक ठरतं. तसंच तुमचं तारूण्य टिकवण्यासाठी जर तुम्ही मशरूमचा आहारात समावेश केला तर फायद्याचे ठरेल. चला तर मग जाणून घेऊया. मशरूम खाण्याचे काय फायदे काय आहेत.


फंगल इन्फेक्शन दूर होते. 

मशरूममध्ये एंटीऑक्‍सीडेंट असतात. ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी नुकसानकारक असलेल्या आजारांपासून वाचता येत. तसंच मशरूमचं सेवन केल्याने  शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात. जे शरीराच्या रक्तवाहीन्यांना कार्यान्वित करतात. त्यामुळे  जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यापासून दूर करता येते. यात मोठ्या प्रमाणात विटामिन बी, डी, पोटेशियम, कॉपर, आर्यन आणि सेलेनियम असते. त्यामुळे हृदयाचे विकार, मधूमेह, कॅन्सर आणि लठ्ठपणा या समस्यांपासून  सुद्दा बचाव  होतो. 

वाढत्या वयाच्या खूणा दिसत नाही

वाढत्या वयात त्वचेला व्यवस्थीत ठेवण्यासाठी एंटीऑक्‍सीडेंट गरजेचे असतात. जास्त प्रमाणात मशरूम खाल्याने त्वचेवर एन्टी एजिंचं कार्य केलं जातं.  याव्यतिरि्क्त मशरूममध्ये काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. यासाठी मशरुम उकळून खाल्ल्यास अधिक फायद्याचं ठरेल. कारण उकळल्यानंतर त्यातील बीटाग्‍लूकन वाढते. ज्यामुळे सुधारणा  दिसून येते. 

 हाडं मजबुत राहतात

हिवाळ्यात मशरून खाल्ल्याने अनेक फायदे होतात. मशरूममध्ये असणारे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. त्यामुळे हाडाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. मशरूममध्ये  व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे आर्थराईटीस होण्याचा धोका कमी होतो. 

आजारांपासून बचाव

 मशरूममध्ये कार्बोहायर्डेट्स असतात.  ज्यामुळे शरीरातील  साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे जास्त भूकेची जाणीव होत नाही. ज्या लोकांना सतत भूक लागत असते अशा लोकांसाठी मशरूमचं सेवन फायद्याचं ठरतं. मशरूमचं सेवन केल्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार तसंच ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. 

Web Title: How to control ageing sings on the face by using mashroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.