शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

वयाच्या तिशीतही दिसाल तरूण; फक्त वापरा 'हा' एक फेसमास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 13:06 IST

जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेचं तारूण्य लोप पावतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. बऱ्याचदा तर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेण्यात येतो.

जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेचं तारूण्य लोप पावतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. बऱ्याचदा तर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण काही केल्या ही समस्या कमी होत नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वयात उद्भवणारी वाढत्या वयाची लक्षणं तसेच वय वाढल्यानंतर त्वचेचं तारूण्य राखू शकता. 

सध्या ब्युटी इंडस्ट्रिमध्ये चारकोल मास्कची क्रेझ पाहायला मिळते. खासकरून फेस्टिव्ह सीझनमध्ये ब्युटी इंडस्ट्रिमध्ये अनेक नवनवीन गोष्ट येत असतात. हल्ली अनेक तरूणी चारकोल मास्कचा वापर करताना दिसून येतात. खासकरून फेस्टिव्ह सीझनमध्ये चारकोल मास्कचा सर्रास वापर करण्यात येतो. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या चारकोलमुळे फार वेदना होतात आणि त्यामध्ये असलेल्या केमिकल्सचा त्वचेवर परिणामही होतो. अशातच आज आम्ही घरीच पील ऑफ चारकोल मास्क तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला ग्लोइंग स्किनसोबत आपल्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी मदत होईल. एवढचं नाहीतर यामुळे वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात आणि तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी एखाद्या 20 वर्षांच्या मुलीप्रमाणे दिसाल.

 जाणून घेऊया घरच्या घरी चारकोल मास्क तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती... 

साहित्य :

अ‍ॅक्टिवेटेड चारकोल - एक चमचा पील ऑफ मास्क - आवश्यकतेनुसार

असं करा तयार : 

चारकोल पील ऑफ मास्क तयार करण्यासाठी अ‍ॅक्टिवेटेड चारकोल आणि पील ऑफ मास्क व्यवस्थित एकत्र करा. आता हा मास्क चेहरा आणि मानेवर जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत लावून ठेवा. त्यानंत मास्क काढून टाका. तुम्हाला शक्य असेल तर यामध्ये मध, ऑलिव्ह ऑइल, शिया बटर किंवा खोबऱ्याचं तेल एकत्र करून वापरा. 

घरी असं तयार करा चारकोल... 

घरच्या घरी चारकोल तयार करण्यासाठी एका दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकून वात लावा. त्यानंतर त्यावर एखादं प्लेट किंवा वाटी ठेवा. पूर्ण झाकून ठेवल्यास दिवा विझून जाईल. त्यामुळे दिवा आणि प्लेटमध्ये थोडं अंतर राहिल याची काळजी घ्या. जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत तसचं ठेवा. दिव्याचा धुर ताटावर एकत्र होइल. तुमचं चारकोल तयार आहे. 

कसं फायदेशीर ठरतं चारकोल? 

अ‍ॅक्टिवेटेड चारकोल त्वचेच्या आतमध्ये जाऊन त्याची स्वच्छता करतं. त्वचेमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी चारकोल मदत करतं. त्वचा स्वच्छ करण्यासोबत त्वचेला पोषण देण्याचंही काम करतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. 

चारकोल मास्कचे इतर फायदे... 

- चारकोल मास्कमुळे एक्जिमा सारखी त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. -  दातांचा पिवळेपणा दूर करतं.- ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्सपासून सुटका. - डाग आणि अ‍ॅक्ने करतं दूर - ओपन पोर्सची स्वच्छता करतं - ऑयली स्किनपासून होते सुटका -  केसांमधील कोंडा करतं दूर - केस बनवा शायनी आणि सिल्की 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स