शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:46 IST

lip care tips in winter : या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

lip care tips in winter : हिवाळ्यात थंडीमुळे जास्तीत जास्त लोकांना ओठ उलण्याची किंवा कोरडे होण्याची समस्या होत असते. अशात अनेकदा ओठांवर भेगा पडतात आणि मासही निघतं. हिवाळ्यात कमी पाणी पिणे, हेल्दी पदार्थ न खाणे आणि जुने प्रॉडक्ट वापरणे ही कारणे सांगता येतील. अशात या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

ओठांची काळजी घेण्यासाठी काय कराल?

- महिला ओठांवर नेहमीच लिपस्टिक लावतात. हे लिपस्टिक जोर लावून किंवा घासून काढण्याचा प्रयत्न करू नका. याने ओठांची त्वचा घासली जाते. तसेच नेहमी असं केल्याने ओठांचा आकारही बिघडू शकतो.- जेव्हा तुम्ही चहा पिता किंवा कोणतंही गरम द्रव्य पिता तेव्हा काळजी घ्या की, फार गरम काही सेवन करू नये. कारण ओठ जेव्हा गरम ग्लास किंवा कपाच्या संपर्कात येतात, त्याने ओठाची त्वचा काळवंडते. याने नंतर ओठांचा मुलायमपणाही कमी होतो. - हिवाळ्यात हलके पदार्थ भरपूर खावेत आणि पाणीही भरपूर प्यावे. याने ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो आणि ओठांची काळजीही योग्य पद्धतीने घेतली जाते. ओठांची त्वचा ड्राय होणार नाही. - रात्री झोपताना ओठांवर खोबऱ्याचं तेल लावावं. जर खोबऱ्याचं तेल लावायचं नसेल तर  तुम्ही चांगल्या क्वालिटीचं पेट्रोलियम जेली सुद्धा वापरू शकता. जेली लावल्यावर हळुवारपणे तुम्ही ओठांची मसाजही करू शकता.- जर ओठ फाटत असतील तर मुलायम करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांवर मध लावावे. सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे. ओठ मुलायम होतील.- हेल्दी पदार्थांचं सेवनही यासाठी महत्वाचं ठरतं. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं मिळतात. अनेकदा शरीरात आयर्नची कमतरता असेल तर ओठ काळे पडतात. त्यामुळे हेल्दी पदार्थांचं सेवन करणं महत्वाचं ठरतं.- ओठ तेव्हाच चांगले राहतील जेव्हा ओठांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. यासाठी नियमितपणे ओठांची हलक्या हाताने मसाज करावी.- ओठांवरील लिपस्टिक क्लिजिंग मिल्कने काढा. कॉटनवर क्लिजिंग मिल्क लावून ओठ साफ करा. तसेच मलाईमध्ये लिंबू मिश्रित करूनही तुम्ही ओठांची मालिश करू शकता. 

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीSkin Care Tipsत्वचेची काळजी