शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमी वयातच पांढरे झालेत केस?; 'या' आजाराचं असू शकतं लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:45 IST

वाढणारं प्रदुषण आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे सध्या केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढच नाहीतर सध्या लहान वयातच अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

वाढणारं प्रदुषण आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे सध्या केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढच नाहीतर सध्या लहान वयातच अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेकदा कमी वयात केस पांढरे होण्याबाबत असं सांगितलं जातं की, तुम्हाला हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका बळावू शकतो. असं एका संशोधनातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपाय शोधत असाल तर सर्वात आधी पांढऱ्या केसांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पांढऱ्या केसांची समस्या बऱ्याचदा अशा पुरूषांमध्ये दिसून येतात की, ज्यांचे केस फार कमी वयातच पांढरे होतात. जर तुम्हाला दिर्घायुषी व्हायचं असेल आणि हृदयरोगांपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयातही केसांचा काळा रंग टिकवून ठेवू शकता आणि हृदय रोगांपासूनही स्वतःचा बचाव करू शकता. 

पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय... 

  • एक काळी मिरी घेऊन त्याची पावडर तयार करा. यासाठी काळ्या मिरीचे काही दाणे पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळासाठी उकळवत ठेवा. केस धुताना या पाण्याने केस धुवा. एक ते दोन महिन्यांसाठी हा उपाय ट्राय करा. 
  • कढिपत्त्याची पानं फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत, तर यामुळे केसांच्या अनेक समस्यांवरही उपाय करणं शक्य होतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी पाण्यामध्ये कढिपत्त्याची पानं उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ करा. तसेच तुम्ही कढिपत्त्याच्या पानांचा रस काढून तो खोबऱ्याच्या तेलामध्ये एकत्र करून केसांना लावू शकता. 
  • कोरफड फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही फायदेशीर ठरते. कोरफडीचा गर काढून केसांना लावल्याने केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत होते. याचा सतत वापर केल्याने केस तुटण्याची समस्या कमी होते. कोरफडीच्या जेलमध्ये लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्याने केस काळे आणि चमकदार होतात.
  • कांद्याचा रसही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण अनेकदा ऐकतो. पण केसांसाठी या रसाचा वापर नक्की कसा करायचा हे अनेकांना माहीत नसतं. एका कांद्याचा रस तयार करून केस धुण्याआधी त्याची पेस्ट व्यवस्थित अप्लाय करा. पांढरे केस हळूहळू काळे होतील. एवढचं नाहीतर केस मुलायम आणि चमकदारही होतील. तसेच केसांमधील कोंडाही कमी होतो. 

 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स