१६ ते २२ ऑक्टोबरपर्यंत International Infection Prevention Week 2019 जगभरात पाळला जातो. फंगल इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डोक्याच्या त्वचेला, त्वचेला कुठेही कोणत्याही वातावरणात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोकांची त्वचा फारच संवेदनशील असते, त्यामुळे त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे, पुरळ, खाज या समस्या होतात.
हिवाळ्यातही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. फंगल इन्फेक्शनही होण्याचा धोका असतो. फंगल इन्फेक्शन डोक्यासंबंधी असो वा त्वचेसंबंधी असो, त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असतं. त्वचेसंबंधी बॅक्टेरिअल आणि फंगल संक्रमण फार त्रासदायक ठरू शकतं. अशात याकडे लक्ष दिलं नाही तर ही समस्या अधिक वाढते.
डोक्यावर होणारं फंगल इन्फेक्शन
डोक्याच्या त्वचेत अनेक इन्फेक्शन होतं. याची लक्षणे नॉर्मल स्किन इन्फेक्शनपेक्षा फार वेगळी असतात. डोक्याच्या त्वचेत फंगल इन्फेक्शन झालं तर त्वचेवर छोटे फोडं होतात. जाड, लाल आणि चिकट थर तयार होतो. ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर वेळीच उपाय केला गेला नाही तर तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ शकते.
त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन
त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन सुद्धा फारच त्रासदायक असतं. यात त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे, लाल पुरळ, पिंपल्स येतात. काही लोकांच्या हाताच्या त्वचेवरही एक थर तयार होतो.
काय कराल उपाय?
वर सांगितलेलं फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी स्वत:ला कोरडं ठेवा. अॅंटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. स्वच्छ कपड्यांचा वापर करा. शरीर स्वच्छ ठेवा. भिजलेले कपडे वापरू नका. याने फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होईल.
अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरा जेल त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात मदत करतं. फंगल इन्फेक्शनमध्ये अॅलोव्हेरा जेलचा वापर केल्यास इन्फेक्शन कमी होतं. याने रॅशेज, खाज आणि जळजळ दूर केली जाते. यासाठी अॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवावी.
कडूलिंबाची पाने
कडूलिंबाची झाडे तुमच्या आजूबाजूला बरीच असतील. या झाडाच्या पानांची पेस्ट, काढा अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. कडूलिंबातील तत्व, जे एकप्रकारे अॅंटी-फंगल गुणाने भरपूर असतात. यासाठी कडूलिंबाची पाने बारीक करून पेस्ट तयार करा. यात एक चमचा लिंबाचा रस आणि हळद टाका. फंगल इन्फेक्शन झालेल्या भागात ही पेस्ट लावा. ३० मिनिटांने ही पेस्ट लावूनच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. याने त्वचा आणि डोक्याच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील.