उन्हाळ्यात आरोग्यदायी खरबूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:46 IST
भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे.
उन्हाळ्यात आरोग्यदायी खरबूज
खरबूज हे फळ जगात ‘मस्कमेलन’, ‘रॉकमेलन’ आणि ‘स्वीटमेलन’ या नावांनी ओळखले जाते. हे विविध आकारांत आणि रंगांत मिळते. वरून पांढरे आणि आतून केशरी रंगांचे असते. याच्या बियांचेदेखील औषधी उपयोग आहेत.भारत, इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचे पीक घेतले जाते. पाणीदार असल्याने शरीराचे. तापमान काहीसे थंड ठेवायला मदत होते. भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. म्हणून कलिंगडाप्रमाणेच पाणीदार असल्याने उन्हाळ्यात सेवन करणे अधिक चांगले असते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी आवर्जून खावे.यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने अन्न पचते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पोटाचे सर्व विकार आणि अपचन या विकारांवरही गुणकारी आहे. भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावे भूक वाढते.