जास्वंदाने खुलवा केसांचे सौंदर्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:03 IST
केसांचे सौंदर्य केसांची चमक आणि मजबूतपणा यावर अवलंबून असते. यासाठी इतर उपायांपेक्षा जास्वंदीचे फूल अत्यंत उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
जास्वंदाने खुलवा केसांचे सौंदर्य !
केसांचे सौंदर्य केसांची चमक आणि मजबूतपणा यावर अवलंबून असते. यासाठी इतर उपायांपेक्षा जास्वंदीचे फूल अत्यंत उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या फुलांमुळे केसगळती थांबवून तुमचे केस मजबूत व चमकदार बनवायला मदत होते. विशेष म्हणजे जास्वंदीची फुले आणि पानांचा उपयोग घरच्या-घरी केसांचे डीप कंडिशनिंग करण्यासाठीही करता येतो. आजच्या सदरात केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी जास्वंदाचा वापर कसा करायचा याविषयी जाणून घेऊयात.* जास्वंद व कांदा केस गळतीची समस्या असल्यास जास्वंदच्या फुलांचा रस आणि कांद्याचा रस एकत्र करून हेअरमास्क बनवा. हा लेप काही दिवस केसांना लावल्यास केस गळतीची समस्या नक्कीच दूर होईल. * जास्वंद व आवळाआवळा केसांसाठी पोषक आहे हे आपणास माहितच आहे. परंतु जास्वंदाच्या पानांच्या रसासोबत आवळ्याचा रस केसांना लावल्यास केसगळती थांबते शिवाय केसांना चमकही येते. यासाठी आवळा व जास्वंदीचा रस एकत्र मिसळून काही वेळ केसांवर लावून ठेवा. * जास्वंद व आॅलिव्ह आॅईलकेसांच्या मजबूतीसाठी जास्वंदीची पाने, फुले व आॅलिव्ह आॅईलने बनवलेला लेप लावा. यासाठी ३ ते ४ जास्वंदीची फुले व तेवढीच पाने घेऊन वाटून घ्या. यात आॅलिव्ह आॅईलचे काही थेंब व थोडे पाणी टाका. १५ मिनिटे हा लेप केसांवर लावून ठेवा. * जास्वंद व कढीपत्ताकेसांचे सौंदर्य वाढविण्यास कढीपत्ताही उत्तम पर्याय आहे. यासाठी जास्वंदीची पाने, कढीपत्ता वाटून घेऊन त्यात थोडे खोबरेल तेल टाका. चांगले मिसळून केसांना लावा. थोडा वेळ थांबून केस धुवून घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.