शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

बघणारे तुमच्याकडे बघतच रहावे असं वाटत असेल तर 'या' तीन गोष्टींचा आहारात करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 11:32 IST

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सोबतच तुमच्या आहारात तुम्हाला काही खास गोष्टींचा समावेशही करावा लागेल.

(Image Credit : ibtimes.co.in)

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सोबतच तुमच्या आहारात तुम्हाला काही खास गोष्टींचा समावेशही करावा लागेल. आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि प्रदूषणामुळे चेहरा डल आणि निर्जिव दिसू लागतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ लागतात. जर तुम्हालाही त्वचेची चमक कायम ठेवायची असेल तर खालील टिप्स फॉलो करा. 

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स खाल्लायाने तुमची त्वचा आकर्षक आणि हेल्दी राहते. कारण यात फायबर, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स असल्याने अनेक रोगांपासूनही बचाव होतो. काजू खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. याने डेड आणि सुरकुत्या पडलेली त्वचा उजळून निघते. अक्रोडमधील अ‍ॅंटी-एजिंग गुण त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात. 

दही

(Image Credit : archanaskitchen.com)

दही सुद्धा त्वचेसाठी सर्वात चांगला आहार आहे. दह्यातील कॅल्शिअमने हाडे मजबूत होतात. सोबतच यात बेसन मिश्रित करून त्वचेवर लावल्याने त्वचेवरून टॅनिंगची समस्या दूर होते. स्किन सॉफ्ट होते. यातील हेल्दी प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया रोगांपासूनही बचाव करतात. कॅल्शिअमसोबतच यात व्हिटॅमिन बी-२, बी-१२, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतात. ही सगळीच तत्वे अन्न पचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच पोटाचे आजार जसे की, ब्लोटिंग, गॅसपासून तुमचा बचाव होतो.

शिंगाडे

शिंगाडे हे पाण्यात उगवणारं एक पौष्टिक फळ आहे. हे फळ आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. याने अनेक आजारांपासून तर सुटका मिळेतच, सोबतच त्वचेवर चमकही येते. यातील पोषक तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जे ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फायदेशीर असतात.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स