लंडनमध्ये स्वत:ची पाच मुले लपवलेली आहेत- करीनाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:01 IST
सध्या करीना आई होणार आहे, अशा बातम्या सर्वत्र रंगू लागल्या असल्याने याबाबत खात्रीसाठी एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करीनाने ....
लंडनमध्ये स्वत:ची पाच मुले लपवलेली आहेत- करीनाचा धक्कादायक खुलासा
सध्या करीना आई होणार आहे, अशा बातम्या सर्वत्र रंगू लागल्या असल्याने याबाबत खात्रीसाठी एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करीनाने चक्क ‘लंडनमध्ये स्वत:ची पाच मुले लपवलेली असल्याचा धक्कादायक खुलासा केला. मात्र हा खुलासा खोडकरपणे केला असल्याने तीने सांगितले.गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर खान लवकरचं गोड बातमी देणार असल्याची चर्चा आहे. करिना तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत नुकतीचं लंडनला जाऊन आली. करिनाला मातृत्वाची चाहूल लागल्याने तिचे मन आनंदी राहावे म्हणून सैफ तिला फिरण्यासाठी लंडनला घेऊन गेल्याचे म्हटले जात होते. मात्र, करिनाने या सर्व बातम्या धुडकावून लावल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमने करिनाशी याबाबत संवाद साधला. तू गरोदर आहेस अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे असा प्रश्न करिनाला विचारला असता ती म्हणाली की, मी माज्या आयुष्याबद्दल नेहमीच खुलेपणाने बोलत आले आहे. जर असं काही असेल तर मी स्वत: सर्वांना याबद्दल सांगेन. मी एक स्त्री आहे आणि कधीनाकधी मी नक्कीच आई होणार.पण सध्या तरी असे काही नाही. याचा अर्थ तू आता आई होणार नाहीस तर असे म्हटले असता करिना म्हणाली, तुम्ही सर्वजण याबाबत इतकी चर्चा करतायं की आता मी फार उत्सुक झाले आहे. लंडनमध्ये माझी पाच मुलं लपवलेली आहेत, असे खोडकरपणे हसत ती म्हणाली.