(Image Credit : health.com)
बदलत्या वातावरणासोबतच त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ लागते. अनेकदा ही समस्या केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्समुळेही होते. अलिकडे महिला अधिक प्रमाणात पार्लरमध्ये जाणं पसंत करतात. त्वचा उजळवण्यासाठी महिला ब्लीचचा वापर करतात. ज्याने त्यांचा चेहरा स्वच्छ आणि आधीपेक्षा सुंदर दिसू लागतो. त्यासोबतच याने चेहऱ्यावरील नको असलेले केसही दूर होतात. वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं झालं आहे.
प्रत्येकीच्या त्वचेसाठी ब्लीचिंग करणं चांगलं असतंच असं नाही. कारण यात वापरलं जाणारं केमिकल फार स्ट्रॉंग असतं. ज्याने त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ लागते. या समस्येवर आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत.
अॅलोव्हेरा
त्वचेसाठी अॅलोव्हेरा अनेकदृष्टीने फायदेशीर असतो. याचा वापर करून तुम्ही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या सहज दूर करू शकता. काही महिलांची त्वचा फार संवेदनशील असते आणि ब्लीचिंगनंतर खाज आणि जळजळ होऊ लागते. अशात अॅलोव्हेराच वापर केला तर तुम्हाला आराम मिळेल. जळजळ किंवा खास आली असेल तर अॅलोव्हेरा चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटे असं करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याने तुम्हाला बरं वाटेल.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल ब्लीचिंगमुळे होणारी खाज शांत करण्यासाठी फार फायदेशीर असते. तुम्ही याचा वापर करून जळजळ दूर करू शकता. अशात तुम्ही जेव्हा ब्लीच कराल तेव्हा त्यानंतर चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. खोबऱ्याच्या तेलात अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगस गुण भरपूर असतात.
दूध त्वचेसाठी फायदेशीर
- दूध तर घरात असतंच. दुधाचे आरोग्याला जेवढे फायदे असतात, तेवढेच सौंदर्य खुलवण्यासाठीही आहेत. याने चेहरा खुलतो.
- कच्च दूध आपल्या त्वचेसाठी फार फायदेशीर असतं.
- दुधाचं चेहऱ्यावर वापर केल्याने चेहऱ्याची चमक कायम राहते.
- कच्च्या दुधात प्रोटीन, कॅल्शिअम आणि चिकट तत्व भरपूर आढळतात. जे शरीरासोबतच त्वचेचं सौंदर्यही वाढवतात.
- दूध त्वचेवर लावल्याने त्वचेवर जळजळ होत नाही आणि खाजही दूर होते.