व्यायामामुळे हार्टअॅटकनंतर येणारे नैराश्य टळते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:26 IST
वर्षानुवर्षे नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नैराश्य येण्याची शक्यता पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असते
व्यायामामुळे हार्टअॅटकनंतर येणारे नैराश्य टळते
व्यायामाचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु संशोधकांनी व्यायाम करण्याचे आणखी एक कारण शोधून काढले आहे.एका रिसर्चनुसार वर्षानुवर्षे नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नैराश्य येण्याची शक्यता कधीच व्यायाम न करणाºया लोकांच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असते.नॉर्वेयियन युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नोलॉजीमधील नर्सिंग सायन्स विभागाच्या लिंडा अर्नस्टसेन यांनी सांगितले की, नियमित शारीरिक हालचाल हार्ट अॅटॅकनंतर येणाऱ्या डिप्रेशनला प्रतिरोध करते.विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांमध्ये नैराश्य येणाची शक्यता झटका न आलेल्या लोकांच्या तुलनेत तिपटीने अधिक असते. १८९ लोकांचे वैयक्तिक विश्लेषण केल्यानंतर व्यायामुळे पोस्ट हार्ट अॅटक आरोग्यावर होणारा परिणाम समोर आला आहे.अध्ययनासाठी करण्यात आलेल्या प्रयोगात या दर आठवड्याला १५० मिनिट सामान्य व्यायाम किंवा दर आठवड्याला ७५ मिनिट कठोर व्यायाम असे मानक ठरविण्यात आले. यावेळी असे दिसून आले की, ज्य १७ टक्के लोकांनी कधीच व्यायाम केला नाही त्यांना हार्ट अॅटॅकनंतर नैराश्य आले.