शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

या उपायांनी केस गळणं होईल कायमचं दूर, एकदा करून तर बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:12 IST

सध्याच्या काळात केस गळण्याची समस्या ही जास्त जाणवते.

(Image credit -rd.com)

सध्याच्या काळात केस गळण्याची समस्या ही जास्त जाणवते. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या चांगले केस मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. केसांच्या तक्रारी असल्यास त्या दूर करणं हे मोठे कामच होऊन बसतं. अशा वेळी घरगुती उपाय नक्कीच फायद्याचे ठरतात. चटकन करता येणारे हे उपाय तुम्‍ही केले तर केस गळती थांबेल. बदलती जीवनशैली, अनियमीत आहार, यांमुळे केसांशी निगडीत समस्या वाढत आहे. तर जाणून घ्या केस गळण्याची कारणं आणि उपाय.

(Image credit-be beautifull)

केस गळण्याची कारणं.बदलती जीवनशैली पौष्टिक घटकांची कमतरता- प्रेंग्नेंसीनंतर केस गळणेतीव्र आजारपणानंतरताण-तणावअनुवांशिकताकर्करोगावरील औषधोपचारांमुळे

(Image credit- first cry parenting)

केस गळणं रोखण्यासाठी काही खास टीप्स -

१) कांदा

कांदा हा केसांसाठी फायदेशीर असतो. कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवून द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे. असे केल्याने केसांची वाढ चांगली होते.

२) मेथी

मेथी दाणे पाण्यात टाकून ते पाणी उकळा. आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. या पाण्यात तुम्ही कांद्याचा रसही टाकू शकता. हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. 

३) आवळा-

केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी आवळा नक्कीच फायदेशीर ठरतो. त्यातील व्हिटामिन सी व अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट गुण यांमुळे केस गळती थांबवते. आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका.

४) केळी आणि लिंबू -

एक केळ्यात लिंबूचा रस मिक्स करून ते एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ती डोक्याला लावा. केस गळण्याची समस्या दूर होईल. असे केल्यास केस वेगाने वाढतात.

५) खोबऱ्याचं तेल-

 केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषक घटक मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधतात. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. दोन तासांनी केस शॅम्पूने धुवून टाका. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स