शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

Diwali 2019 : दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:37 IST

सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवसांत सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तसेच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतला जातो.

सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवसांत सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तसेच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतला जातो. पण या दिवसांत घराची साफसफाई, फराळाची तयारी यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं फार अवघड असतं. अशातच लाइफस्टाइल एक्सपर्ट दीपशिखा देशमुख यांनी आपल्याला काही उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया सविस्तर... 

आपण अनेकदा सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा आधार घेतो. पण त्यामध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकवेळी बाजारातील उत्पादनांचा आधार घ्यावा असं नाही, तर तुम्ही आपल्या स्वयंपाक घरात आढळून येणाऱ्या गोष्टींचाही आधार घेऊ शकता. जाणून घेऊया काही खास घरगुती उपाय... 

चेहरा उजळवण्यासाठी...

- एका बिट पाण्यात उकडून ते कुस्करून घ्या. - कुस्करलेल्या बिटामध्ये एक चमचा दूध आणि अर्धा चमचा चंदनाची पावडर एकत्र करा. - मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्याला लावा. - सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. 

तसेच नैसर्गिक आद्रता आणि कोलोजन वाढविण्यासाठी कोरफडीचा रस किंवा जेल दररोज चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं. 

डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी... 

- ताज्या गाजराचा रस डोळ्यांभोवती लावा, किमान 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर धुवून टाका. - काकडी आणि मध एकत्र करून डोळ्यांभोवती लावा.

पुरळ येत असतील तर... 

- पुदिन्याची काही पानं बारिक वाटून घ्या. - एक चमचा पाणी तसेच अर्धा चमचा हळद त्यामध्ये एकत्र करा. - मिश्रण व्यवस्थित करून पुरळ येत असलेल्या ठिकाणी लावा. 15 ते 20 मिनिटं तसचं ठेवा.- कोमट पाण्याने धुवून टाका. - पुदिन्यातील अॅन्टीऑक्सिडंट्स पुरळ कमी करतात. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा फेसपॅख वापरा.

 केसांच्या सौंदर्यासाठी... 

- दोन चमचे आवळ्याची पावडर, एक चमचा कॉफी आणि थोडा कांद्याचा रस एकत्र करून घ्या. - तयार मिश्रण केसांना लावा. केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स