प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावासाठी डाएट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:54 IST
नवीन रिसर्च असे सांगते की पुरषांनी हेल्दी डायट घेण्याचे प्रमाण वाढवायला हवे.
प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावासाठी डाएट
स्त्री आणि पुरुषाला निसर्गाने वेगळे बनविले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यदेखील वेगळे असते. आता पुरुष म्हटल्यावर धसमुसळेपणा, रांगडेपणा येणारच. ते खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष देत नाही. जे समोर येईल ते खातात. परंतु नवीन रिसर्च असे सांगते की पुरषांनी हेल्दी डायट घेण्याचे प्रमाण वाढवायला हवे. प्रोस्टेट कॅन्सर ही समस्या पुरुषांमध्ये वाढत आहे. त्यापासून बचावासाठी पुढील डायट घ्या!१. टोमॅटो : पौष्टिकतेच्या बाबतीत टमाटे ‘सूपरफुड’ म्हणून ओळखले जातात. प्रोस्टेट कॅन्सरला आळा घालण्यासाठी फायदेशीर ‘लिकोपिन’ असते.२. आॅयस्टर : पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी लाभदायक झिंकचे प्रमाण आॅयस्टरमध्ये विपूल प्रमाणात असते. वीर्यनिर्मिती आणि हेल्दी टेस्टेस्टेरॉनची पातळी कायम राखण्याचे काम झिंक करते.३. लसूण : आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी लसूण खूप फायदेशीर असते. अधिक प्रमाणात लसणाचे सेवन करणाºया पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.४. सॅलमॉन : केवळ प्रोटिनचा अत्युच्च स्रोत म्हणून नाही तर सॅलमॉनमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडही विपूल प्रमाणात असते. प्रोस्टेट कॅन्सर, नैराश्य, कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी मदत होते.५. ब्लूबेरी : ब्लूबेरीमध्ये प्रोअनथोस्यॅनिडीन्स असते. हार्ट अॅटॅक, मधूमेह, स्मृतिभ्रंश यांसारख्या आरोग्याव्याधींपासून आपले रक्षण करते.