(Image Credit : executivestyle.com.au)
केसगळतीची समस्या अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा सर्वात जास्त फटका हा पुरूषांना बसतो आहे. केसगळतीची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे डायबिटीस हे सुद्धा आहे. यात शरीर योग्यप्रकारे ब्लड ग्लूकोज प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशात रक्तात ग्लूकोजचं प्रमाण शरीरात जास्त होऊ लागतं.
डायबिटीसमुळे आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. हाय ब्लड शुगरचा प्रभाव डोळ्यांच्या दृष्टीवर, पचनक्रियेवर आणि किडनीवरही बघायला मिळतो. त्यासोबतच केसगळतीची समस्या देखील डायबिटीसच्या लोकांना होते.
डायबिटीसमध्ये केसगळती होते का?
हाय ब्लड शुगरच्या रूग्णांना केसगळतीची समस्या होऊ शकते. कारण नर्वस सिस्टीम आणि शरीरात तरल पदार्थाच्या सर्कुलेशनवर हाय ब्लड प्रेशरचा प्रभाव पडतो. याचा अर्थ हा आहे की, शरीराच्या इतर भागांप्रमाणेच डोक्यात असलेली रोमछिद्रांनाही योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही.
केसांची मूळं कमजोर होतात. त्यामुळे केस तुटून गळू लागतात आणि केसही पातळ होऊ लागतात. याकारणाने पुरूषांना टक्कल पडू लागतं.
ऑटो इम्यून आजारांचा वाढतो धोका
ज्यामुळे डायबिटीसमध्ये केसगळतीचा धोका अधिक वाढतो त्याचं कारण म्हणजे ऑटो-इम्यून सिस्टीम. याचा धोका डायबिटीसमध्ये अधिक राहतो. थायरॉइड किंवा एलोपेसिया एरियाटासारखे आजार डायबिटीस रूग्णांमध्ये आढळतात. पुन्हा पुन्हा होणाऱ्या या समस्यांमुळे शरीर आणि केसांवर प्रभाव पडतो. तसेच ऑटो-इम्यून समस्येचा वाईट प्रभाव केसांवरही पडतो.