(Image Credit : www.lifealth.com)
कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं. कोथिंबीरीत अॅंटी-ऑक्सिडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात.
कोथिंबीरमध्ये अॅंटी-फंगल प्रॉपर्टीज असतात जे कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनपासून बचाव करतातत. त्यासोबतच वाढत्या वयाचे त्वचेवर दिसणारे संकेतही दूर केले जातात. कोथिंबीर तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर असते. याने त्वचेवरील अतिरिक्त ऑइल दूर केलं जातं. यामुळे त्वचेवर पिंपल्सही येत नाहीत.
आता जर कोथिंबीरचे त्वचेसाठी इतके सगळे फायदे आहेत. तर याचा फेस मास्क किंवा पॅक लावण्यात काहीच गैर नाही. पण तुम्हाला हेही माहीत असलं पाहिजे की, कोथिंबीरमध्ये कोणत्या गोष्टी मिश्रित करून त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो.
सुरकुत्या आणि ऑयली त्वचेचा पॅक
त्वचा ग्लोइंग आणि ऑइल फ्री करायची असेल तर कोथिंबीरच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यात अॅलोवेरा आणि लिंबाचा रस मिश्रित करा. अॅलोवेराचा जेल वापरण्याऐवजी अॅलोवेराचा पानांमघधील गर अधिक चांगला ठरेल. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. याने त्वचेवर केवळ चमकदारपणाच येणार नाही तर त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.
डेड स्कीन दूर करण्यासाठी पॅक
कोथिंबीर तांदळाच्या पिठात मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. १ कप कोथिंबीरची पाने बारीक करा आणि २ चमचे तांदळाचं पीठ व एक लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा पाण्याने धुवावा.