वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता फायद्याचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 16:29 IST
कडीपत्त्याची पाने खाल्ली तर यामुळे तुमचे वजन कमी होण्याबरोबरच अपचनाचा त्रासही कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता फायद्याचा
जास्त वजनाबरोबरच पित्ताचाही त्रास अनेकांना होत आहे. तुम्ही रोजच्या जेवणातही कडीपत्ता वापरता. मात्र अनेकजण हा न खात काढून टाकतात. तुम्ही जर रोज ३-४ कडीपत्त्याची पाने खाल्ली तर यामुळे तुमचे वजन कमी होण्याबरोबरच अपचनाचा त्रासही कमी होईल.कडीपत्त्याची पाने पचनक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि एन्झिमचे नियमित उत्पादन करतात. ती सहजपणे अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. तुम्ही अपचनामुळे त्रासलेले असता तेव्हा, एक चिमूटभर हिंगाबरोबर दोन किंवा तीन कडीपत्त्याची पाने, ताकामध्ये मिसळून घ्या.यामुळे पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्याची इच्छा असणाºया व्यक्तींनी दररोज दिवसातून तीन किंवा चार कडीपत्त्याची पाने घ्यावी आणि तो चाऊन खावीत. वाईट कोलेस्ट्रॉल सहज विसर्जित आहे, आणि वजन सहज कमी होते.