(Image Credit :hopkinsmedicine.org)
कोणतही मेहनतीचं काम करायचं असेल, स्ट्रेस असेल किंवा घराची साफसफाई करायची असेल किंवा वर्कआउट करायचं असेल तर सामान्यपणे सगळ्या महिला केस बांधतात आणि काम करतात. केसा मागे व्यवस्थित बांधल्यावर किंवा अंबाडा घातल्यावरच त्यांना जास्त सहज वाटतं. म्हणजे काम करताना केस पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत नाहीत आणि कामही व्यवस्थित होतं. पण तुमची हे केस बांधण्याची स्टाईल तुम्हाला नियमितपणे डोकेदुखी देऊ शकते.
हेअर स्टाईल आणि डोकेदुखीचा संबंध
जेव्हा तुम्ही केस टाईट इलॅस्टिकचा रबर बॅंड लावून केस वरच्या दिशेने करून पोनिटेल किंवा अंबाडा घालता तेव्हा याने अनेकांना डोकेदुखी होऊ लागते. आणि त्यामुळे कामावर लक्ष देणं कठिण होऊन बसतं. तुमची हेअर स्टाईल आणि डोकेदुखीचा संबंध यावर अवलंबून असतो की, तुम्ही केस किती घट्ट किंवा टाईट बांधता.
केस ताणून बांधणे
जेव्हा तुम्ही इलॅस्टिक रबर बॅन्डच्या माध्यमातून केस ओढून-ताणून बांधता तेव्हा डोक्याच्या त्वचेवर प्रेशर पडतं. हेअर फॉलिकल्समध्येही तणाव येतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ लागते. आपल्या हेअर फॉलिकल्समध्ये भरपूर नर्व्स असतात आणि यात तणाव आला तर याने डोकेदुखी होऊ लागते.
पोनीटेल
जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर अशाप्रकारची हेअरस्टाईल तुमची डोकेदुखी वाढवण्याचं कारण ठरू शकते. तर काही लोकांना केसांवर कंगवा फिरवणे, केस बांधणे, शेव्ह करणे, चष्मा घालणे किंवा इअररिंग्समुळेही डोकेदुखी होऊ शकते.
मायग्रेन असेल तर केस मोकळे ठेवा
अशा हेअरस्टाईलने डोक्याच्या त्वचेवर अधिक प्रेशर येतं, त्यामुळे ही हेअरस्टाईल करणे टाळावे. खासकरून टाइट पोनिटेल किंवा अंबाडा बांधू नका. जर तुमचं आधीच डोकं दुखत असेल तर केस बांधण्याऐवजी मोकळे सोडा.