कोल्ड ड्रिंक म्हणजे मधुमेहाला आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 05:02 IST
सॉफ्ट ड्रिंकमुळे वर्षाला जवळपास 45 हजार हार्ट पेशंट्स आणि कॅन्सरमुळे 6,500 लोक मृत्यूमुखी पडतात.
कोल्ड ड्रिंक म्हणजे मधुमेहाला आमंत्रण
अमेरिकेमधील एका विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सातत्याने सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने एका वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या तुलनेत दीड लाख अधिक लोकांचा मृत्यू होतात. सॉफ्ट ड्रिंकमुळे वर्षाला जवळपास 45 हजार हार्ट पेशंट्स आणि कॅन्सरमुळे 6,500 लोक मृत्यूमुखी पडतात. हे संशोधन टफ्ट्स यूनिव्हर्सिटीने सादर केले आहे. काही प्रकरणांवरून असे लक्षात आले आहे की, सॉफ्ट ड्रिंक्स अल्कोहोलहून अधिक घातक आहे.विशेष म्हणजे टफ्ट्स यूनिव्हर्सिटीच्या या संशोधनाला इंडियन मेडिकल काऊंसिलच्या अहवालानेही दुजोरा दिला आहे. इंडियन मेडिकल काऊंसिलच्या अहवालानुसार, भारतात जवळपास 7 कोटी 70 लाख लोक मधुमेहाला बळी पडतात. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 10 लाख लोक डायबेटिजमुळे मृत्युमुखी पडतात. हा आकडा येणा-या काळात वाढेल असेही सांगितले.